Home /News /aurangabad /

राज्यातल्या 15 खासगी लॅबची मनमानी, राज्य सरकारकडून नोटीस; परवाना रद्द करण्याचा इशारा

राज्यातल्या 15 खासगी लॅबची मनमानी, राज्य सरकारकडून नोटीस; परवाना रद्द करण्याचा इशारा

कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) लक्षात घेता राज्य सरकारकडून अधिकाधिक कोरोना चाचण्या (Covid 19 Test)करण्याचे वारंवार आवाहन केलं जात आहे.

    औरंगाबाद, 15 जानेवारी: कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) लक्षात घेता राज्य सरकारकडून अधिकाधिक कोरोना चाचण्या (Covid 19 Test)करण्याचे वारंवार आवाहन केलं जात आहे. पण महाराष्ट्रात अशा अनेक खासगी लॅब आहेत ज्यांच्यावर या आवाहनानं काहीही फरक पडत नाही. राज्यात अशा अनेक खासगी लॅब ज्यांनी खूप पूर्वीपासून सरकारची परवानगी घेतली होती, मात्र आजपर्यंत त्यांनी कोरोनाची एकही चाचणी केलेली नाही. अशा खासगी लॅबना (Notice to private labs) नोटीस पाठवण्यात येत आहे. तसंच परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे. औरंगाबाद शहर महानगरपालिकेनं 15 खासगी लॅबना तसा इशारा दिला आहे. शहरातील 39 खासगी लॅबना एंटीजन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र यापैकी 15 खासगी लॅबनी आतापर्यंत एकही कोरोना चाचणी केलेली नाही. या सर्व 15 लॅबला नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीसमध्ये लिहिले आहे की, कोरोना चाचणीसाठी लॅबची परवानगी का रद्द करू नये? या सर्व लॅबला लवकरच नोटीसीला उत्तर पाठवण्यास सांगण्यात आलं आहे. हेही वाचा- Dangerous..! Omicron च्या नव्या स्ट्रेनचा कहर;  पसरतो वेगानं सार्वजनिक आरोग्य विभागाने NABL आणि ICMR मान्यताप्राप्त लॅबमध्ये एंटीजन आणि RTPCR चाचण्या घेण्यास मान्यता दिली आहे. विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरातील खासगी लॅबला पालिकेचा आरोग्य विभाग परवानगी देतो. कोरोना चाचणीचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. मात्र परवानगी मिळाल्यानंतर 15 खासगी लॅबने आतापर्यंत एकही कोरोना चाचणी केलेली नाही. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत शहरातील या 15 खासगी लॅबना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या खासगी प्रयोगशाळांना नोटीस ज्या 15 खासगी लॅबला कोरोना चाचणी न केल्याबद्दल नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यात एमआयटी हॉस्पिटल, एशियन सिटी केअर, मराठवाडा लॅब रोशनगेट, मिलिटरी हॉस्पिटल कॅन्टोन्मेंट, यशवंत गाडे हॉस्पिटल गारखेडा, शनी मंदिराजवळील आयएमए हॉल, गणेश लॅब, पुंडलिकनगर, ओरियन सिटी यांचा समावेश आहे. केअर हॉस्पिटल, अमृत पॅथॉलॉजी लॅब जालना रोड, सुमनांजली नर्सिंग होम, युनिसेफ पॅथॉलॉजी लॅब भडकलगेट, कृष्णा डायग्नोस्टिक, कस्तुरी पॅथ लॅब गारखेडा, सह्याद्री हॉस्पिटल सिडको एन-2 लॅबचाही समावेश आहे. महाराष्ट्र कोरोना अपडेट दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या एका दिवसात कोरोनाचे 43 हजार 211 रुग्ण आढळले आहेत. एकट्या मुंबईत 11 हजार 317 रुग्ण आढळले आहेत. यासोबतच राज्यभरात कोरोनामुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईबद्दल बोलायचे झालं तर येथे एका दिवसात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या एका दिवसात कोरोना बरे झालेल्यांची संख्या 33 हजार 356 आहे. त्याचप्रमाणे ओमायक्रॉनची 238 नवीन प्रकरणे देखील नोंदवली गेली. महाराष्ट्रात आतापर्यंत 1605 ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या