Home /News /aurangabad /

MIM चे खासदार इम्जियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण, कोरोनाचे नियम पायदळी तुडवले, VIDEO

MIM चे खासदार इम्जियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण, कोरोनाचे नियम पायदळी तुडवले, VIDEO

विकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) असतानाही रात्री 12 पर्यंत कव्वालीचा कार्यक्रम (Qawwali event) आयोजित करण्यात आला होता.

    औरंगाबाद, 04 जुलै : 'लॉकडाऊनमध्ये दुकानं उघडणारच' अशी धमकी देऊन खळबळ उडवून देणारे एमआयएमचे खासदार इम्जियाज जलील (aurangabad mp imtiaz jalil) यांना कोरोना नियमाचा विसर पडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत औरंगाबादेत जलील यांच्या उपस्थितीत कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जलील यांच्या नोटांची उधळण करण्यातआली. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (corona Third Wave) भीती वर्तवली जात आहे. अशातच राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचा बोजबारा उडालेला दिसतो. औरंगाबादमध्येही अशीच एक घटना घडली आहे. विकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) असतानाही रात्री 12 पर्यंत कव्वालीचा कार्यक्रम (Qawwali event) आयोजित करण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे, या कव्वालीच्या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे देखील उपस्थित होते. यावेळी जलील यांना व्यासपीठावर बोलवून नोटांची उधळण करण्यात आली होती. या कार्यक्रमात एकाही व्यक्तीने मास्क घातला नव्हता, हे व्हिडीओतून दिसून येत आहे. औरंगाबादमध्ये सध्या विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अशातच काल रात्री 12 वाजेपर्यंत कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कव्वालीच्या कार्यक्रमाला शेकडोंची गर्दी जमली होती. विशेष म्हणजे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील देखील या कार्यक्रमात रात्री उशिरापर्यंत सहभागी होते. दौलताबाद रस्त्यावरील रिसॉर्टमध्ये शनिवारी मध्यरात्री पर्यंत हा कार्यक्रम सुरु होता. खासदार जलील यांचा कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या