Home /News /aurangabad /

'लस नाही तर दारू नाही'; औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे मद्यप्रेमींना झटका

'लस नाही तर दारू नाही'; औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे मद्यप्रेमींना झटका

शासनाची पायमल्ली करणाऱ्या दुकानांवर कारवाई होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आले.

    औरंगाबाद, 24 नोव्हेंबर : राज्यातील कोविड-19 लसीकरणाचं (Covid Vaccination) प्रमाण 74 टक्के असून औरंगाबाद लसीकरणाचं (Aurangabad Vaccination) प्रमाण केवळ 56 टक्के इतके आहे. हे प्रमाण राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत कमी असल्याने औरंगाबाद जिल्ह्याने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये औरंगाबाद जिल्हा लसीकरणात 26 व्या क्रमांकावर गेला आहे. शासनाने संपूर्ण राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी केले असून संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण अपेक्षित आहे. लसीकरण वाढलं तर कोरोनाचा आळा घालणं सोपं जाईल. (No vaccine no alcohol Aurangabad District Collectors decision shocks alcoholics) त्यानुसार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. या मोहीमेअंतर्गत जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने, बिअर शॉप, देशी दारूची दुकाने आदी आस्थापनांना आदेश लागू केले आहेत. यानुसार लस घेतली नसल्यास नागरिकांना दारू दिली जाणार नाही. हे ही वाचा-कोरोना लस घेणे टाळले, औरंगाबादेत बाबा पेट्रोल पंप सील, प्रशासनाची धडक कारवाई मद्य प्रेमींना जिल्हाधिकाऱ्यांनी झटका दिल्याचं म्हटलं जात आहे. नो वॅक्सिन नो दारू (No vaccination no alcohol) अशी मोहीम राबवली जात आहे. लस घेतलेल्या नागरिकांनाच मद्य दिले जाणार आहे. शासनाची पायमल्ली करणाऱ्या दुकानांवर कारवाई होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोना लसीकरण अधिक जलद गतीने व्हावे यासाठी नवी नियमावली जारी केली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Aurangabad News, Corona, Corona vaccination

    पुढील बातम्या