Aurangabad: लग्नाच्या 6व्या दिवशीच सुखी संसाराचं स्वप्न मिळालं धुळीस; नववधुच्या कृत्यानं कुटुंब हैराण

Aurangabad: लग्नाच्या 6व्या दिवशीच सुखी संसाराचं स्वप्न मिळालं धुळीस; नववधुच्या कृत्यानं कुटुंब हैराण

Marriage Fraud Aurangabad: लग्न झाल्यानंतर अवघ्या सहाव्या दिवशीच नववधू फरार (bride flee after 6 days of marriage) झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज याठिकाणी उघडकीस आली आहे.

  • Share this:

वाळूज, 01 सप्टेंबर: लग्न झाल्यानंतर अवघ्या सहाव्या दिवशीच नववधू फरार (bride flee after 6 days of marriage) झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज याठिकाणी उघडकीस आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधून येते असं सांगून माहेरी गेलेली नववधू परत आलीच नाही. लग्न जुळवणाऱ्या अन्य दोन दलाल महिला देखील फरार झाल्या आहेत. त्यामुळे सुखी संसराची स्वप्न रंगवणाऱ्या तरुणाला लग्नाच्या सहाव्या दिवशीच धोका मिळाला आहे.

शुभांगी प्रभाकर भोयार असं फरार 25 वर्षीय नववधूचं नाव असून ती सिडको परिसरातील रामनगर येथील रहिवासी आहे. तर संतोष उत्तम बोडखे असं फसवणूक झालेल्या 32 वर्षीय वराचं नाव आहे. बोडखे यांचा नेवासा याठिकाणी कापड विक्रीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाह शुभांगी भोयर नावाच्या 25 वर्षीय तरुणीसोबत झाला होता. पंढरपुरातील सुमनबाई साळवे आणि अंजली पवार यांच्या मध्यस्थीनं हा विवाह झाला होता.

हेही वाचा-सेम टीशर्ट घातल्यानं निष्पाप तरुणाचा गेला जीव; भयंकर कृत्यानं मुंबई हादरली

24 ऑगस्ट रोजी नेवासा येथील एका मंदिरात दोघांचा हिंदू पद्धतीनं विवाह संपन्न झाला होता. सासरच्या मंडळींकडून नववधूला मंगळसूत्र, कर्णफुले, पायातील पैंजण असं जवळपास 40 ते 50 हजार रुपयांचे दागिने घातले होते. त्याचबरोबर हे लग्न जुळवून देणाऱ्या दोन दलाल महिलांना दोन लाख रुपये देण्यात आले होते. पण सध्या त्या दोघी दलाल महिला देखील फरार आहेत.

हेही वाचा-मुंबई: डोक्यावर कुटुंबाचं ओझं अन् मनात नैराश्य;20वर्षीय हतबल तरुणीनं संपवलं जीवन

लग्नानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी नववधूनं भावाला राखी बांधायला माहेरी जाते, असा हट्ट धरला. त्यामुळे संतोष शुभांगीला घेऊन पंढरपूर येथे आला. याठिकाणी त्यानं शुभांगीला दलाल महिला सुमनबाई साळवे यांच्या घरी सोडलं आणि तो परत नेवाशाला आपल्या घरी आला. दरम्यान मध्य रात्री शुभांगी घरातून गायब झाली. यानंतर संतोष आणि त्याच्या नातेवाईकांनी शुभांगीचा सर्वत्र शोध घेतला. पण तिचा काही थांगपत्ता लागला नाही. यानंतर नातेवाईंकानी दलाल महिलांची चौकशी केली, त्या दोघीही फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

Published by: News18 Desk
First published: September 1, 2021, 12:33 PM IST

ताज्या बातम्या