Home /News /aurangabad /

''थोडा Entertainment हो ना चाहिए यार..'' , सुप्रिया सुळेंनी उडवली राज ठाकरेंच्या सभेची खिल्ली

''थोडा Entertainment हो ना चाहिए यार..'' , सुप्रिया सुळेंनी उडवली राज ठाकरेंच्या सभेची खिल्ली

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) एकदिवसीय औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत.

    औरंगाबाद, 18 एप्रिल: आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) एकदिवसीय औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान घेतलेल्या सभेत सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांची खिल्ली उडवली आहे. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे तो येईल भाषण देऊन निघून जाईल,तुम्ही तुमचे काम करा ना, असं म्हणतं सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना काम करण्याचं आवाहन केलं आहे. त्याला इतके महत्व देता कशाला, असंही त्या म्हणाल्या आहेत. या सभेत सुळे यांनी कार्यकर्त्यांचे कान फुंकले आहेत. थोडं इंटरटेन्ट पण होऊ द्या ना, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी राज ठाकरे यांच्या भाषणावर टोला मारला आहे. मनोरंजन पण व्हायला हवे सिरीयस पिक्चर पण किती, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. दूरदर्शन किती पहायचे कधी कधी इतर चॅनेल पण पाहत जा ना यार, राज ठाकरे यांच्या भाषणावर सुप्रिया सुळे यांनी या सभेत विनोदी टीका ही केली आहे. थोडा इंटरटेन्मेंट हो ना चाहिए यार असं हिंदीत म्हणत राज ठाकरेंवर विनोदी शब्दात निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा 1 मे रोजी औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. पुण्याच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी दोन मोठ्या गोष्टींची घोषणा केली. ज्यात 01 मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा तर 05 जूनला अयोध्या येथे भेट देणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अपघातानंतर सायकल रायडरच्या एका निर्णयाने पलटली बाजी! पराक्रमानंतर Super Mom चं होतंय कौतुक  1 मे रोजी महाराष्ट्र दिनी संभाजीनगर येथे जाहीर सभा घेणार आणि 5 जूनच्या दिवशी अयोध्येला जाणार आहे. 5 तारखेला सहकाऱ्यांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार आहे, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Aurangabad, MNS, NCP, Raj Thackeray (Politician), Supriya sule

    पुढील बातम्या