मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

'बाहेर जाऊन बसा', खासदार जलील यांनी महिला पोलिसाच्या हातावर मारला फटका, LIVE VIDEO

'बाहेर जाऊन बसा', खासदार जलील यांनी महिला पोलिसाच्या हातावर मारला फटका, LIVE VIDEO

 चित्रिकरण करत त्या जलील यांच्यापर्यंत पोहोचल्या. तेव्हा जलील यांनी मोबाईल खाली पाडण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांचा हातावर फटका मारला.

चित्रिकरण करत त्या जलील यांच्यापर्यंत पोहोचल्या. तेव्हा जलील यांनी मोबाईल खाली पाडण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांचा हातावर फटका मारला.

चित्रिकरण करत त्या जलील यांच्यापर्यंत पोहोचल्या. तेव्हा जलील यांनी मोबाईल खाली पाडण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांचा हातावर फटका मारला.

    सचिन जिरे, प्रतिनिधी औरंगाबाद, 02 जून : या ना त्या मुद्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (MP imtiyaz jaleel) यांचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. दुकानावर कारवाई का केली म्हणून कामगार आयुक्तांना जाब विचारण्यासाठी गेले असता, चित्रिकरण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. शहरात लॉकडाऊनच्या दुकानं सुरू ठेवणाऱ्या दुकानदारावर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई केली होती. त्यामुळे संतापलेले इम्तियाज जलील थेट कामगार आयुक्तांच्या कार्यालयात दुकानदारांना घेऊन पोहोचले. यावेळी कामगार आयुक्तांच्या कार्यालयात सोशल डिस्टिंगचा पुरता फज्जा उडाला होता. लोकांनी एकच गर्दी केली होती. एक महिला पोलीस कर्मचारी जमलेल्या जमावाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होत्या. चित्रिकरण करत त्या जलील यांच्यापर्यंत पोहोचल्या. तेव्हा जलील यांनी मोबाईल खाली पाडण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांचा हातावर फटका मारला. त्यामुळे मोबाईल खाली पडला. ..18 दिवस ऑफिसमध्येच होतो, कोरोनाची लागण झाल्यानंतर न्यायमूर्तींनी असा दिला लढा एवढंच नाहीतर, 'आम्ही काय मनोरंजनासाठी, चित्रपट पाहायला नाही आलो. जमत नसेल तर बाहेर उभे राहा, अशा शब्दांत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना जलील यांनी सुनावले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तर दुसरीकडे, 'लॉकडाऊनमुळे आधीच लोकांचे रोजगार बुडाले आहे. दुकानात हातावर पोट असणारे कामगार काम करत आहे. तूला काही वाटत कसं नाही?  अशी एकेरी भाषेत जलील यांनी कामगार आयुक्तांशी बाचाबाची केली होती. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. एवढंच नाहीतर 50 हजारांचा दंड का ठोठावण्यात आला, असा आरोपही जलील यांनी केला होता. मात्र, आपण असा कोणताही दंड स्विकारला नाही, असा दावा कामगार आयुक्त व्हिडीओत करत असल्याचे दिसून येत आहे. ICC चं क्रिकेट फॅन्सना गिफ्ट, दुबईतील बैठकीत वर्ल्ड कपबाबत मोठा निर्णय अखेर कामगार आयुक्त यांनी इम्तियाज जलील यांच्याविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आल्याचे आरोप जलील यांच्यावर करण्यात आला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या