Home /News /aurangabad /

औरंगाबादेत आईमुळे मुलाला जीवदान; रक्तगट वेगळा असूनही केली किडनी दान अन्...

औरंगाबादेत आईमुळे मुलाला जीवदान; रक्तगट वेगळा असूनही केली किडनी दान अन्...

औरंगाबादमधील एका महिलेनं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. तिने आपलं रक्तगट वेगळं असूनही मुलाला किडनी दान (Mother donate kidney) केली आहे.

    औरंगाबाद, 03 ऑक्टोबर: आई आणि बाळाचं नातं हे जगातील सर्वात नि:स्वार्थ नातं मानलं जातं. आपल्या बाळावर आभाळाएवढं संकट आलं तरी आई आपला जीव धोक्यात घालून पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढू शकते. याचा प्रत्यत नुकताच औरंगाबाद येथे आला आहे. येथील एका महिलेनं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. तिने आपलं रक्तगट वेगळं असूनही मुलाला किडनी दान (Mother donate kidney) केली आहे. 22 सप्टेंबर रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली असून आता या मायलेकराची प्रकृती उत्तम आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहायक म्हणून कार्यरत असलेले किशोर रमेश निकम यांचा अठरा वर्षांचा एकुलता एक मुलगा प्रतीक मागील काही दिवसांपासून आजारी होता. त्याला औरंगाबाद, जळगाव, पुणे आणि हैदराबाद अशा विविध ठिकाणी उपचारासाठी नेलं. पण त्याच्यावर काही परिणाम होतं नव्हता. दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत चालली होती. उपचारादरम्यान त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हेही वाचा-पोटच्या मुलासोबत करायची धक्कादायक कृत्य; महिलेचा प्रताप वाचून व्हाल सुन्न एकुलत्या एक मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं ऐकून निकम परिवाराच्या पायाखालची जमीन सरकली. दुसरीकडे प्रतीकची प्रकृती आणखी खालावत जात होती. त्याच्यावर डायलिसिसवर जगण्याची वेळ आली. येथून पुढे जिवंत राहण्यासाठी किडनीचं प्रत्यारोपण करणं गरजेचं बनलं होतं. पण किडनी कोण देणार हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अशात प्रतीकची आई अनिता किशोर निकम यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता किडनी दान करायला तयार झाल्या. हेही वाचा-बापाच्या कृत्याची चिमुकल्याला मिळाली शिक्षा; अखेर कृष्णा नदीत सापडला मृतदेह त्यांनी किडनी दान केली मात्र त्यांचा रक्तगट प्रतीकच्या रक्तगटापेक्षा विभिन्न होता. त्यामुळे आणखीच गुंतागुंत वाढली असं, असतानाही सिग्मा हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर्स गणेश बर्नेला, डॉ. सारूक, डॉ. अभय महाजन, डॉ. अरुण चिंचोले आदींनी अथक परिश्रम घेत ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. सध्या दोघा मायलेकाची प्रकृती ठणठणीत असून प्रतीकची आई अनिता यांना देखील डिस्चार्ज देण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad

    पुढील बातम्या