नवले कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत कुटुंबाचा आधार असलेले तीन प्रमुख सदस्य गमावल्यानं संपूर्ण गावावरच शोककळा पसरली आहे.
औरंगाबाद, 25 एप्रिल : कोरोनानं अनेक कुटुंबांचं कधीही भरून न निघणारं असं नुकसान केलं आहे. उस्मानाबादमधील एक कुटुंबही असंच कोरोनामुळं (Corornavirus) जवळपास उद्धवस्त झालं. औरंगाबाद विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. संजय नवले यांचं कोरोनानं निधन झालं होतं. पण त्यांच्या निधनानंतर त्यांचे आई वडील हा धक्का सहन करू शकले नाही आणि दोघांनीही या धक्क्यानं प्राण त्यागले (Mother and father died after death of son) आहेत.
प्राध्यापक डॉक्टर नवले यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर औरंगाबाद येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि 15 एप्रिल रोजी त्यांचं निधन झालं. डॉक्टर नवले हे मूळचे उस्मानाबादचे होते. त्यामुळं उस्मानाबादेत त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला डॉ. नवले यांचे आई वडील माणिकराव नवले आणि मंदाकिनी नवले हेही उपस्थित होते.
(वाचा - सावधान, घराबाहेर फिरण्याचा विचार करताय? आधी हा VIDEO पाहा, पोलीस काय करतायेत हाल)
मुलाच्या अचानक जाण्यानं वृद्ध नवले दाम्पत्याला तीव्र धक्का बसला. या धक्क्यानं त्यांचा रक्तदाब कमी झाला आणि दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती गंभीर झाल्यानं त्यांना पुण्याला रुग्णालयात हलवण्यात आलं. पण माणिकराव नवले आणि मंदाकिनी नवले दोघांकडूनही उपचारांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळं 23 एप्रिल रोजी पहाटे माणिकराव यांचं निधन झालं तर त्यानंतर दोन तासांनी त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांचंही निधन झालं. त्यामुळं नवले कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या आठ दिवसांचत्या कालावधीत कुटुंबाचा आधार असलेले तीन प्रमुख सदस्य गमावल्यानं संपूर्ण गावावरच शोककळा पसरली आहे.
(वाचा-'हा कसला उद्धटपणा आहे?' BMC च्या ट्वीटवर भडकले काँग्रेसचे आमदार)
माणिकराव आणि मंदाकिनी नवले यांची कोरोना चाचणीही उपचारादरम्यान पॉझिटिव्ह आली होती. मात्र मुळात मुलगा गमावल्यामुळं बसलेल्या धक्क्यानं त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. स्वतःच्या डोळ्यांनी मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर वृद्ध नवले दाम्पत्य पूर्णपणे धक्क्यात होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.