Home /News /aurangabad /

आता बोला! औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील ICU मधील मॉनिटरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, व्हेंटिलेटर निगेटिव्ह

आता बोला! औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील ICU मधील मॉनिटरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, व्हेंटिलेटर निगेटिव्ह

घाटी रुग्णालयाने 60 ठिकाणाचे नमुने घेत त्यांची कोरोना तपासणी केली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला.

औरंगाबाद, 02 जून : औरंगाबादेतील घाटी रुग्णालयातील ( Ghati Hospital Aurangabad)आयसीयूतील मॉनिटर (Monitor) कोरोना पॉझिटिव्ह (corona report positive) आला आहे. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. कोरोना टेस्ट फक्त संशयित रुग्णांची म्हणजे माणसांचीच होते, असा समज असेल. मात्र, खबरदारी म्हणून घाटीतील वॉर्ड, आयसीयूतील 60  ठिकाणांहून घेण्यात आलेल्या नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या तपासणीत  एका मॉनिटरच्या सरफेसवर कोरोनाचा विषाणू आढळून आला. कोरोनाने 14 महिन्यांपासून थैमान घातले आहे. साधी सर्दी झाली, खोकला जाणवला की कोरोनाचा संशय व्यक्त केला जातो. तेव्हा कोरोना झाला की नाही, याचे निदान होण्यासाठी संशयित रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येतो. अँटिजन टेस्ट आणि आरटीपीसीआर तपासणीद्वारे संशयित पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, याचे निदान केले जाते. कोरोनाबाधित सासूचा विकृतीचा कळस, सुनेला मारली मिठी अन् रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच.. हीच पद्धत आता रुग्णालयातील वॉर्ड, आयसीयू आणि रुग्णांच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणांसाठी राबविली जात आहे. रुग्णांना उपचारादरम्यान खोकला, शिंकाचा त्रास असतो. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना वॉर्डातील विविध वैद्यकीय उपकरणांवर, फरशीवर कोरोनाचे विषाणू पसरण्याची भीती असते. कामगार आयुक्तांशी बाचाबाची भोवली, इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल, VIDEO यादृष्टीने रुग्णालयांत स्वच्छतेवर सर्वाधिक भर दिला जातो. यापूर्वी ऑपरेशन थिएटरचे (ओटी) वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात येत असे. एखादा संसर्गित रुग्ण आला तर ओटी बंद करून निर्जंतुकीरण, तपासणी केली जाते. कोरोना प्रादुर्भावात अगदी असेच वॉर्ड, आयसीयूच्या बाबतीत खबरदारी घेतली आहे. घाटी रुग्णालयाने 60 ठिकाणचे नमुने घेत त्यांची कोरोना तपासणी केली. तेव्हा त्यात केवळ एका उपकरणाचा अहवाल कोरोना सकारात्मक आला. व्हेंटिलेटर कोरोना निगेटिव्ह आल्याचेही घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले. अशाप्रकारे खासगी रुग्णालयांमध्येही तपासणी होत असल्याचे सांगण्यात आले. आरटीपीसीआर तपासणी आयसीयू, वॉर्डातून 60 नमुने गोळा करण्यात आले होते. सर्व नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आले आहे. फक्त एका आयसीयूतील मॉनिटर क्रमांक-2 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर व्हेंटिलेटर निगेटिव्ह आला आहे. स्वच्छतेवर भर दिला जात आहे. यात आरटीपीसीआर तपासणीच करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिक माहिती लवकरच दिली जाईल, असं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या