Home /News /aurangabad /

Raj Thackeray: 1 मे रोजी औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ थडाडणार; 'राज' गर्जनेचा टिझर प्रदर्शित

Raj Thackeray: 1 मे रोजी औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ थडाडणार; 'राज' गर्जनेचा टिझर प्रदर्शित

Raj Thackeray: 1 मे रोजी औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ थडाडणार; 'राज' गर्जनेचा टिझर प्रदर्शित

Raj Thackeray: 1 मे रोजी औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ थडाडणार; 'राज' गर्जनेचा टिझर प्रदर्शित

Raj Thackeray Aurangabad Rally teaser released: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. 1 मे रोजी होणाऱ्या या सभेचा टिझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे.

औरंगाबाद, 26 एप्रिल : मुंबई, ठाण्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. औरंगाबाद (Aurangabad)मधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर 1 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ही सभा होणार आहे. या सभेसाठी पोलिसांची परवानगी प्रतिक्षेत असतानाही मनसैनिकांकडून राज ठाकरेंची जोरदार तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून या सभेचा एक टिझर मनसेकडून रिलीज (Raj Thackeray Aurangabad rally teaser released) करण्यात आला आहे. या टिझरच्या माध्यमातून नागरिकांना सभेला येण्याचं निमंत्रण मनसेकडून देण्यात आलं आहे. या टिझरला राज गर्जना असं नाव देण्यात आलं आहे. तसेच या टिझरमध्ये औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असा उल्लेख कऱण्यात आला आहे. 1 मे रोजी होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार? आणि कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुंबई आणि ठाण्यातील सभेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधातही आवाज उठवला होता. आता औरंगाबादमधील सभेच्या राजगर्जनेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज 'सध्या सभेचे पेव फुटले आहे, मीही सभा घेणार आहे. या सभेत सगळ्यांचा सोक्षमोक्ष लावून टाकायचा आहे. नव हिंदू आणि तकलादू आणि नकली हिंदूत्वादी आले आहे, तुमचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा भगवा कसा आहे असं म्हणणाऱ्यांचा समाचार घ्यायचा आहे. हे जे नकली हिंदुत्ववादी आलेत त्यांचा मला समाचार घ्यायचा आहे' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना थेट इशारा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरे यांचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Aurangabad, MNS, Raj Thackeray

पुढील बातम्या