औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची हेळसांड; बेड मिळत नसल्याने जमिनीवर घ्यावे लागताहेत उपचार

औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची हेळसांड; बेड मिळत नसल्याने जमिनीवर घ्यावे लागताहेत उपचार

Corona Updates Aurangabad: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे खासगी अथवा शासकीय रुग्णालयात खाटांची कमतरता जाणवत (Lack of beds in hospital) आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागत आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, 23 मार्च: औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण (Corona patients increase) झपाट्यानं वाढत आहेत. पण कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची गती खूपच कमी आहे. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत दररोज 700 ते 1000 नवीन रुग्णांची भर पडत आहे. शहरात वाढत्या रुग्णांचा ताण प्रशासनावर येत आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे खासगी अथवा शासकीय रुग्णालयात खाटांची कमतरता जाणवत (Lack of beds in hospital) आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागत आहेत. तर काही ठिकाणी एकाच बेडवर दोन ते तीन रुग्णांना एकत्र ठेवावं लागत आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळं घाटी रुग्णालयावर मोठा ताण आला आहे. घाटी रुग्णालयातील अपघात विभागात तर रुग्णांची अवस्था अत्यंत दयनीय होतं आहे. रुग्णालयात आलेल्या संशयित रुग्णांना त्यांचा रिपोर्ट येईपर्यंत 24 तास जमिनीवरच पडून राहावं लागत आहे. अपघात विभागात कोरोना संशयित रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे, की ज्यामुळं अपघात विभागाचं सर्व नियोजन विसकटलं आहे. दर दहा मिनिटाला एक कोरोनाचा संशयित रुग्ण या ठिकाणी येत आहे.

संशयित रुग्णांचा स्वॅब घेतल्यानंतर, त्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही? हे कळण्यासाठी किमान 24 तास लागतात. तोपर्यंत संबंधित रुग्णांची हेळसांड होते. शहरातील कोणत्याच रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णाला गरज असेल तरच रुग्णालयात दाखल करावं. अन्यथा रुग्णावर घरी राहून उपचार द्यावेत. गरज नसताना रुग्णालयातील बेड आडवून धरू नयेत, अशाप्रकारची चाचपणी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी करायला सुरुवात केली आहे.

हे ही वाचा - आमदार आणि मंत्रीही मुख्यमंत्र्यांचं ऐकनात; कोरोना खबरदारीच्या नियमांना हरताळ

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला आदेश देण्यात आले आहे. यानंतर शहरी भागात सीसीसी, डिसीएच आणि डीसीएचसी या उपचार सुविधांमध्ये एकूण 6014 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागात सीसीसीमध्ये 1244 तर डीसीएचसीमध्ये 225 बेड्स उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नागरिकांना उपलब्ध बेड संदर्भात माहिती मिळवण्यासाठी शहरी भागात डॉ. बासीत अली खान- 9326789007 तसेच पीयुष राठोड- 8830061846, 8855876654 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं जात आहे. तसेच ग्रामीण भागातील बेडसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी डॉ. कुडीलकर - 9420703008 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 23, 2021, 11:56 PM IST

ताज्या बातम्या