"25 जूनपर्यंत निर्णय घ्या अन्यथा, शेतकऱ्यांची मुलं हातात दगड घेतील" दूध उत्पादकांचा सरकारला इशारा

Milk Producers demand to rise rate: दूध दर वाढीच्या मागणीसाठी आता दूध उत्पादक आक्रमक झाले असून सरकारला एक इशारा दिला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 18 जून: ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) अडचणीत आता आणखी वाढ होता दिसत आहे. मराठा आंदोलना दरम्यान ओबीसींनी आंदोलनाला सुरुवात केली त्यातच आता दूध उत्पादकांनी दूध दरवाढीसाठी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा (Milk producers warn government over milk rate) दिला आहे. दूध दर वाढीवरून राज्यात राडा होणार, जो पर्यंत राडा होत नाही तोपर्यंत सरकारही लक्ष देत नाही. शेतकऱ्यांच्या तरुण पोरांच्या हातात दगड येऊ देऊ नका. 25 जूनपर्यंत दुधाला 35 रुपये लिटर भाव द्या असा धमकीवजा इशारा शेतकरी किसन सभेच्या डॉ अजित नवले (Ajit Nawale) यांनी दिला आहे. लाख गंगा गावात झालेल्या ग्रामसभेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

दूध खरेदीचे दर 10 ते 15 रुपयांनी पाडले

लॉकडाऊनचा गैरफायदा घेत खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर 10 ते 15 रुपयांनी पाडले आहेत. शेतकर्‍यांना यामुळे कोट्यवधीचे नुकसान सहन करावे लागले आहे. लॉकडाऊनमुळे मागणी घटल्याचे कारण देत दूध खरेदीचे दर सातत्याने पाडले जात आहेत. प्रत्यक्षामध्ये मागणी किती कमी झाली व त्यामुळे दरामध्ये किती घट करणे अपेक्षित आहे याचा कुठलाही ताळमेळ स्पष्ट न करता, दूध उत्पादकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन दूध संघ व दूध कंपन्यांकडून घेतला जात आहे, अशा पार्श्वभूमीवर या लुटमारीच्या विरोधामध्ये राज्यव्यापी संघर्ष उभा करण्याची भूमिका दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने घेतली आहे.

'लुटता कशाला फुकटचं न्या' 

आंतरराष्ट्रीय बाजारात पावडरचे दर कमी झाल्याचे कारण देत जेंव्हा अशाच प्रकारे दूध खरेदीचे दर पाडण्यात आले होते, तेव्हा 'लुटता कशाला फुकटचं न्या' म्हणत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने गेल्यावेळी जोरदार राज्यव्यापी आंदोलन केले होते. या आंदोलनाची सुरुवात लाख गंगा गावात ग्रामसभेचा ठराव घेऊन करण्यात आली होती. शेतकरी नेते बच्चू कडू, डॉ. अजित नवले, विठ्ठल पवार, धनंजय धोरडे, अनिल देठे, खंडू वाकचौरे, रोहिदास धुमाळ, लाखगंगामध्ये झालेल्या या ग्रामसभेसाठी आवर्जून उपस्थित होते.

गृहिणींचे बजेट कोलमडणार! खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय नाहीच

आंदोलनाचा एल्गार

आता पुन्हा लॉकडाऊनचे कारण देत दूध खरेदीचे दर पाडण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लाखगंगा गावात ग्रामसभा घेऊन राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार सुरू करण्याचा निर्णय परिसरातील नागरिकांनी व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतील सामील असणाऱ्या शेतकरी संघटनांनी घेतला आहे.

ग्रामसभेतील ठराव

आज झालेल्या या ग्रामसभेमध्ये गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाखगंगा गावात दूध उत्पादकांच्या बाजूने पहिला ठराव करण्यात आला राज्यभर त्यानंतर अशाच प्रकारच्या ग्रामसभा गावोगाव घेत ग्रामसभांचे ठराव घेतले जाणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात दूध उत्पादकांच्या झालेल्या लुटीची चौकशी करा, दोषींवर कारवाई करा व दूध उत्पादकांची केलेली लूट वसूल करून ती दूध उत्पादकांना परत करा, दूध उत्पादकांना अशा प्रकारे वारंवार लुटता येऊ नये यासाठी सहकारी व खासगी दूध संघांना लागू होईल अशा प्रकारचा कायदा करा, ऊस धंद्याप्रमाणेच दूध व्यवसायासाठी सुद्धा एफ. आर. पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे दुहेरी संरक्षण लागू करा, दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचला, एक राज्य एक ब्रँड स्वीकारून राज्यात सुरू असणारी अनिष्ट ब्रँड कॉम्पिटिशन थांबवा या प्रमुख मागण्या करणारा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. त्यानंतर राज्यभरातील विविध गावांमध्येही अशाच प्रकारचे ठराव करून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहेत.

Published by: Sunil Desale
First published: June 18, 2021, 4:59 PM IST
Tags: aurangabad

ताज्या बातम्या