Home /News /aurangabad /

Marathwada News: व्यापाऱ्याची अरेरावी, पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण, संचारबंदीतही सुरू होतं दुकान

Marathwada News: व्यापाऱ्याची अरेरावी, पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण, संचारबंदीतही सुरू होतं दुकान

पोलिस दुकानदाराला समजवण्याचा प्रयत्न करत होते. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. उलट त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला काठीनं मारण्याचा प्रयत्न केला.

परभणी, 27 एप्रिल : कोरोना काळात 24 तास रस्त्यावर उतरून जीव धोक्यात घालत पोलिस (Maharashtra Police) कर्तव्य बजावत आहेत. पण जिंतूरमध्ये पोलिसांबरोबर अर्वाच्य भाषेत वाद करत मारहाणीचा प्रयत्न (grocery trader abused and beat policeman) केल्याचं समोर आलं आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पोलिस जीव मुठीत घेत कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्याबरोबर घडलेल्या या घटनेनं नाराजी व्यक्त होत आहे. (वाचा-Aadhaar लिंक मोबाईल नंबर विसरलात; घरबसल्या फक्त 2 मिनिटांत असा शोधा) परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरात मंगळवारी दुपारी पोलिस पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात ऋषिकेश प्रॉव्हिजन हे किराणा मालाचं दुकान सुरू दिसलं. संचारबंदीतही प्रल्हाद टाकरस यांनी हे दुकान सुरू ठेवलं होतं. त्यामुळं पेट्रोलिंग टीममधील उपनिरीक्षक नागनाथ पाटील आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावत दुकान बंद करण्यास सांगितलं. पण दुकान मालक टाकरस यांनी पोलिसांशी एकेरी भाषेत बोलायला सुरुवात करत अरेरावी केली. तसंच त्यांनी उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांच्या हातातील काठी हिसकावली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत पोलिसांना  मारण्याचा प्रयत्न केला. (वाचा-कोरोना संकटात Google, Microsoft नंतर आता Apple ही करणारा भारताला आर्थिक मदत) पोलिस दुकानदार टाकरस यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनीही टाकरस यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. उलट त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला काठीनं मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनीही त्याला पकडत खाक्या दाखवला. या घटनेनंतर टाकरस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संचारबंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध, पोलीस प्रशासन कठोर पावले उचलणार असल्याची माहिती, पोलीस उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना दिली. दुकानदाराच्या अरेरावीने नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस कर्तव्य बजावण्यासाठी रस्त्यावर आहेत. याकाळात अनेक पोलिसांना कोरनाची लागण झाली. तर अनेकांनी जीवही गमावला. पण तरी हे सर्व कोरोना योद्धे उभे आहेत. त्यांच्यासोबत असा प्रकार होऊ नये, असं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे.
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Coronavirus, Maharashtra police, Marathwada, Parbhani

पुढील बातम्या