विकास कामांचा पाढा वाचून दाखवत मुख्यमंत्र्यांचं आंदोलन करणाऱ्या एमआयएमला प्रत्युत्तर

विकास कामांचा पाढा वाचून दाखवत मुख्यमंत्र्यांचं आंदोलन करणाऱ्या एमआयएमला प्रत्युत्तर

मुख्यमंत्र्यांकडून औरंगाबादमध्ये संतपीठाची घोषणा. संतांची शिकवण जगभरात पोहोचवण्यासाठी संतपीठ उभारतोय असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 17 सप्टेंबर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एमआयएमने विविध मुद्द्यांवरुन उपरोधात्मक आंदोलन (MIM agitation) करत मुख्यमंत्र्यांना विरोध दर्शवला. मात्र, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विविध विकास कामांचा (Development works) पाढा वाचून दाखवत आंदोलन करणाऱ्या राजकीय पक्षांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान एमआयएमने उपरोधात्मक आंदोलन केलं. औरंगाबादमधील पाण्याचा प्रश्न तसेच विकास कामांच्या मुद्द्यांवरुन एमआयएमने हे आंदोलन केलं. एमआयएमने केलेल्या या आंदोलनाला मुख्यमंत्र्यांनी विकासकामांचा पाढा वाचून दाखवत प्रत्युत्तर दिलं.

मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, निजामशाहीतून मुक्ती म्हटल्यावर अजूनही निजामाच्या काही खुणा आहेत. त्या म्हणजे निजामशाही शाळा... पडायला आल्या आहेत. निजामकालीन दीडशे शाळांचा पुनर्विकास करत आहोत. नकोयत त्या शाळा. मराठवाड्यातील सर्व निजामकालीन शाळांचं पुनर्विकास करणार आहोत.

औरंगाबादमध्ये संतपीठ ते परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पाहा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करत आहोत. आता काही जण म्हणतील की मुख्मयंत्री आले इतकी कामे जाहीर केली पुढे काय होणार? पुढे याचं लोकाप्रण होणार. काही जण असंही म्हणतील मुख्यमंत्र्यांनी ही यादी वाचली पण अमूक एक गोष्ट बोललेच नाही. ज्या काही आज करता येण्यासारख्या गोष्टी आहेत त्या मी जाहीर करतोय. इतरही मोठ-मोठे विषय आपण मार्गी लावत आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

"ज्याप्रमाणे निजामाशी लढलो त्याप्रमाणे कोविडशी लढू" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून औरंगाबादमध्ये संतपीठाची घोषणा. संतांची शिकवण जगभरात पोहोचवण्यासाठी संतपीठ उभारतोय - मुख्यमंत्री

निजामकालीन दीडशे शाळांचं पुनर्विकास करणार - मुख्यमंत्री

परभणीमध्ये शासकीय महाविद्यालय उभारणार

अहमदनगर आणि औरंगाबादला रेल्वेने जोडण्याचं मुख्यमंत्र्यांचं रेल्वे राज्यमंत्री दानवेंना आवाहन

औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरू करण्याची संकल्पना

औरंगाबादमधील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 317.22 कोटी रुपये

उस्मानाबाद शहरासाठी 168.61 कोटी रकमेतून भूमीगत गटार योजना

शिर्डी विमानतळ औरंगाबादशी जोडणार

रस्त्यांचे डांबरीकरण होणार

हिंगोलीला हळद प्रक्रिया प्रकल्प उभारणार

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारणार, त्यातून जनतेला प्रेरणा मिळणार

सफारी पार्क लवकर पूर्ण करणार

200 मेगावॅट प्रकल्प सुरू करणार

First published: September 17, 2021, 11:16 AM IST

ताज्या बातम्या