औरंगाबादमध्ये संतपीठ ते परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पाहा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

औरंगाबादमध्ये संतपीठ ते परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पाहा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

मराठवाडा निजामशाहीतून मुक्त केला आता कोविडवर वार करायची वेळ आली आहे. ज्याप्रमाणे निजामाशी लढलो त्याप्रमाणे कोविडशी लढू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 17 सप्टेंबर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त (Marathwada Mukti Sangram Din) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये औरंगाबाद येथे संतपीठ स्थापन करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून औरंगाबादमध्ये संतपीठाची घोषणा

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद संतपीठाची (Santpeeth) घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने आपण सुरू करत आहोत. संतांची शिकवण जगभरात पोहोचवण्यासाठी संतपीठ उभारतोय. संतपीठ हे फक्त प्रेक्षणीय स्थळ राहता कामा नये. आज संतपीठ उभारतोय हे संत विद्यापीठ झालं पाहिजे जे जगात इतर कुठेही नसेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

यासोबतच निजामकालीन दीडशे शाळांचं पुनर्विकास करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. पाहुयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलेल्या महत्त्वाच्या घोषणा.

"ज्याप्रमाणे निजामाशी लढलो त्याप्रमाणे कोविडशी लढू" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून औरंगाबादमध्ये संतपीठाची घोषणा. संतांची शिकवण जगभरात पोहोचवण्यासाठी संतपीठ उभारतोय - मुख्यमंत्री

निजामकालीन दीडशे शाळांचं पुनर्विकास करणार - मुख्यमंत्री

परभणीमध्ये शासकीय महाविद्यालय उभारणार

अहमदनगर आणि औरंगाबादला रेल्वेने जोडण्याचं मुख्यमंत्र्यांचं रेल्वे राज्यमंत्री दानवेंना आवाहन

औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरू करण्याची संकल्पना

औरंगाबादमधील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 317.22 कोटी रुपये

उस्मानाबाद शहरासाठी 168.61 कोटी रकमेतून भूमीगत गटार योजना

शिर्डी विमानतळ औरंगाबादशी जोडणार

रस्त्यांचे डांबरीकरण होणार

हिंगोलीला हळद प्रक्रिया प्रकल्प उभारणार

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारणार, त्यातून जनतेला प्रेरणा मिळणार

सफारी पार्क लवकर पूर्ण करणार

200 मेगावॅट प्रकल्प सुरू करणार

Published by: Sunil Desale
First published: September 17, 2021, 10:39 AM IST

ताज्या बातम्या