Home /News /aurangabad /

Maharashtra Weather Alert: पुन्हा पावसाचं धुमशान; पुढील 3 दिवस 'या' भागात जोरदार बरसणार

Maharashtra Weather Alert: पुन्हा पावसाचं धुमशान; पुढील 3 दिवस 'या' भागात जोरदार बरसणार

File Photo

File Photo

Maharashtra Weater Forecast: राज्यात दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री पुन्हा एकदा राज्यातील काही भागांत जोरदार बरसायला सुरुवात केली. तसेच पुढील काही दिवस आणखी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    औरंगाबाद, 2 ऑक्टोबर : मराठवाड्यात अतिवृष्टीसह (Heavy rainfall) थैमान घातलेल्या पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली. मात्र, त्यानंतर काल रात्रीपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. त्यातच आता पुढील तीन दिवस राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज (heavy rain prediction) हवामान खात्याने वर्तवला आहे. आधीच शेती संपूर्णपणे पाण्यात वाहून गेली आणि आता पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने यामुळे बळीराजाची चिंता आणखी वाढली आहे. पुढील हवामानाचा अंदाज 2 ऑक्टोबर कोकण - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. "शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढू, धीर सोडू नका" मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन 3 ऑक्टोबर कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 4 ऑक्टोबर कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. राज्यात पावसाचं थैमान: आतापर्यंत 436 जणांचा बळी तर 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान दोन दिवसांपूर्वी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात 71 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर राज्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत काही ठिकाणी 4 तर काही टिकाणी 8 वेळा अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. तर केवळ वीज कोसळून 196 जणांचा मृत्यू झाला आहे. 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान गुलाब चक्रीवादळामुळे 2 दिवसात पावसाने अनेक भागात नद्या ओसंडून वाहत आहेत. शेतीचं नुकसान झालं आहे. अनेकांना जीव गमवावा लागला, जनावर वाहून गेली आहेत. काही ठिकाणी 100 ते 150 मिली पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील 10 पैकी 7 जिल्ह्यात सरासरी 170 ते 190 मिली पाऊस झाला आहे. उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टर आणि बोटीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आतापर्यंत 81 % पंचनामे झाले असून 19% पंचनामे उर्वरित आहेत. 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे पंचनाम्यात अडथळे येत आहेत. पंचनामे झाल्यानंतर 22 लाख हेक्टर जमिनीच नुकसान होण्याची अंदाज आहे. गुलाब चक्रीवादळामुळे 7 ते 8 हजार कोटीचं अंदाजित नुकसान झालं आहे. मागील 3 दिवसात उस्मानाबादमध्ये 6 जण तेरणा नदीच्या पाण्यात अडकले होते, त्यांना वाचवण्यात आलं आहे. यवतमाळमध्ये बसच्या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने बुलडाणा, औरंगाबाद आणि लातूर येथे एकही मृत्यू नाही. मृतकांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील अतिवृष्टी भागाचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत असंही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Aurangabad, Maharashtra, Rain

    पुढील बातम्या