PHOTOS: बीडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, गेवराई तालुक्यातील कोळगावला आलं काश्मीरचं रूप

(सुरेश जाधव, प्रतिनिधी) Hailstorm in Beed: राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस पडत आहे. बीड जिल्ह्यातही वादळी वारा आणि गारांसह जोरदार पाऊस बरसला.

  • Share this:

बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळी 6 पासून मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यामध्ये कोळगाव कवडगाव, सावरगाव, तांदळा काजळा या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गारांचा सडा पडला होता.

या परिसरात काश्मीर सारखा पांढरा शुभ्र गारांचा सडा पडला होता. वादळी वारा विजांचा कडकडाट आणि गारा यामुळं डाळिंब, टरबूज, खरबूज आणि पेरूच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आलेल्या फळबाग शेतकऱ्यांचं या गारपीटीमुळे आता पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे.

 मध्यरात्रीपर्यंत बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती यात गारपीट झाल्यामुळे आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अगोदरच लागल्यामुळे शेतकरी गारपीटमुळे पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

वादळी वाऱ्यामुळे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गारपीटीचा फटका सर्वात जास्त गेवराई तालुक्यामध्ये बसला असून कोळगाव गावात तर पांढरा शुभ्र गारांचा सडा आणि त्यामध्ये वाहणारे पाणी पाहायला मिळालं.

वादळी वाऱ्यामुळे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गारपीटीचा फटका सर्वात जास्त गेवराई तालुक्यामध्ये बसला असून कोळगाव गावात तर पांढरा शुभ्र गारांचा सडा आणि त्यामध्ये वाहणारे पाणी पाहायला मिळालं. गारपीटीचा फटका जनावरांनाही बसला आहे.

First published: April 15, 2021, 7:46 AM IST
Tags: beedrain

ताज्या बातम्या