मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /VIDEO: ह. भ. प. ताजुद्दीन महाराज यांचे निधन, कीर्तन सुरू असतानाच आला हृदयविकाराचा झटका

VIDEO: ह. भ. प. ताजुद्दीन महाराज यांचे निधन, कीर्तन सुरू असतानाच आला हृदयविकाराचा झटका

kirtankar tajudding maharaj died due to heart attack: कीर्तन सुरू असतानाच ह. भ. प. ताजुद्दीन महाराज यांना हृदयविकाराचा झटका.

kirtankar tajudding maharaj died due to heart attack: कीर्तन सुरू असतानाच ह. भ. प. ताजुद्दीन महाराज यांना हृदयविकाराचा झटका.

kirtankar tajudding maharaj died due to heart attack: कीर्तन सुरू असतानाच ह. भ. प. ताजुद्दीन महाराज यांना हृदयविकाराचा झटका.

औरंगाबाद, 28 सप्टेंबर : हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले ताजुद्दीन बाबा (Kirtankar Tajuddin Baba) यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. विशेष म्हणजे कीर्तन करतांना उभे असतानाच त्यांना हृदयविकाराचा (Heart attack) झटका आला आणि ते खाली बसले. त्यानंतर मांचावरच त्यांचे निधन झाले. ही घटना काल रात्री नंदुरबार (Nandurbar) येथे घडली. ताजुद्दीन बाबा हे घनसावंगी (Ghansavangi Jalna) तालुक्यातील बोधलापूर येथे राहत होते. त्यांनी स्वतः विठ्ठल रुखमाई यांची देऊळ उभे केले होते.

हिंदू मुसलमान दोघांतील दरी मिटवण्यासाठी त्यांनी हजारो कीर्तने केली. त्यांचा जन्म औरंगाबाद जवळील सातारा भागात झाला होता. त्यांनी काही काळ पुणे येथे जाऊन कंपनी मध्ये काम ही केले होते. त्यांना लहानपणापासूनच कीर्तनाची आवड होती. त्यांच्या या आवडीमुळे त्यांना आणि कुटुंबाला त्रास ही सहन करावा लागला होता.

नेहमी प्रमाणे ताजुद्दीन महाराज यांचे कीर्तन सुरू होते. त्यांच्या या कीर्तनाला नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते स्टेजवर खाली बसले. कीर्तन सुरू असताना काही जण आपल्या मोबाइलमध्ये हे शूट करत होते. त्याचवेळी ताजुद्दीन महाराजांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मराठवाड्यात पावसाचं थैमान; पुराच्या पाण्यात 37 नागरिक अडकले तर दोघे गेले वाहून घटनास्थळी NDRF रवाना

महाराष्ट्रात कीर्तनाची एक मोठी परंपरा आहे. अनेक कीर्तनकारांप्रमाणेच ताजुद्दीन महाराज हे सुद्धा प्रसिद्ध होते. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असत. मुस्लीम असतानाही गीता, संत परंपरेबाबत त्यांना मोठे ज्ञान अवगत होते. गीता आणि कुराण या दोन्हीबाबत त्यांना चांगला अभ्यास होता.

कीर्तनकार ताजुद्दीन महाराज यांचे कीर्तन लाईव्ह ऐकण्यासाठीच नागरिक गर्दी तर करत होतेच यासोबतच युट्यूबवरही त्यांचे अनेक कीर्तनाचे व्हिडीओ अपलोड आहेत. युट्यूबवर अपलोड असलेल्या या व्हिडीओजला मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि व्ह्यूव्ज पहायला मिळतात.

" isDesktop="true" id="610007" >

अनेकदा ताजुद्दीन महाराज यांनी सांगितले आहे की, लहानपणापासूनच त्यांना संत, वारकरी सांप्रदाय याच्या बाबत आवड प्रेम होते. वारकरी संप्रदायाचे संस्कार असल्याने त्यांना लहानपणापासून भजन, कीर्तन करण्यात रस होता. अनेकांचा विरोध असतानाही त्यांनी आपली आवड असलेल्या संतांची परंपरी, भजप, कीर्तन करण्यास पसंती दिली.

ताजुद्दीन महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी तरुणांपासून ते वयोवृद्दांपर्यंत सर्वच जण उपस्थिती लावत असत. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून नागरिक येत असतंय. त्याचप्रमाणे कीर्तनासाठी त्यांना देशभरातील विविध भागांतून आमंत्रितही करण्यात येत होते.

First published:
top videos

    Tags: Aurangabad