पहिल्या पावसाचा आनंद ठरला शेवटचा! गॅलरीतून खाली पडल्यानं चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

पहिल्या पावसाचा आनंद ठरला शेवटचा! गॅलरीतून खाली पडल्यानं चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Aurangabad News: पहिल्या पावसाचा आनंद लुटणाऱ्या (Joy of first Rain) एका चिमुकलीचा गॅलरीतून पडून मृत्यू ( death after falling from gallery) झाल्याची दुर्दैवी घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 18 मे: पहिल्या पावसाचा आनंद लुटणाऱ्या (Joy of first Rain) एका साडेचार वर्षीय चिमुकलीचा गॅलरीतून पडून मृत्यू (death after falling from gallery) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. काल सायंकाळी अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा आनंद लुटण्यासाठी साडेचार वर्षाची मुलगी गॅलरीत जाऊन उभी राहिली. यावेळी गॅलरीतून खाली डोकावत असताना तोल बिघडल्यानं ही साडेचार वर्षांची चिमुकली पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली. ज्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ही घटना औरंगाबाद शहरातील हर्सूल परिसरातील श्रेयसनगर येथील आहे. तर संबंधित मृत चिमूरडीचं नाव हर्षदा उर्फ राणी भगवान वाघ असं आहे. काल सायंकाळी औरंगाबाद परिसारात जोराचा पाऊस सुरू झाला होता. यावेळी पाऊस पाहाण्यासाठी हर्षदा गॅलरीत जाऊन उभी राहिली. खेळत असताना अचानक ती गॅलरीतून डोकावली. यावेळी तिला स्वतःचा समतोल आवरता आला नाही, त्यामुळे ती गॅलरीतून खाली पडली.

ही घटना घडताच आई वडिलांसह आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरून पडल्यामुळे हर्षदाच्या डोक्याला आणि शरीराला अनेक ठिकाणी दुखापत झाली. यावेळी तिला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण सोमवारी पहाटे तिची प्राणज्योत मालवली.

हे ही वाचा-Free Fire game प्रमाणे मान मोडून मित्राचा खून, लपविण्यासाठी मृतदेह जमिनीत पुरला

मृत हर्षदाचे वडील एक ट्रॅक्टरचालक असून हर्सूल परिसरात श्रेयसनगर याठिकाणी ते पहिल्या मजल्या भाड्याच्या घरात राहात होते. आपल्या साडेचार वर्षाच्या लेकीचा मृत्यू झाल्यानं वाघ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. साडेचार वर्षीय हर्षदाचा हा पहिला पाऊस अखेरचा पाऊस ठरला आहे. सोमवारी हर्षदावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Published by: News18 Desk
First published: May 18, 2021, 10:42 AM IST

ताज्या बातम्या