किरीट सोमय्या काय ED चे प्रमुख आहे का? सुप्रिया सुळेंनी फटकारलं

किरीट सोमय्या काय ED चे प्रमुख आहे का? सुप्रिया सुळेंनी फटकारलं

किरीट सोमय्या (kirit somiya) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे वाद पेटला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 20 सप्टेंबर : भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somiya) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे वाद पेटला आहे. ' केंद्रीय यंत्रणा चलन फाडणाऱ्या पोलिसांसारखे वाटत आहेत. किरीट सोमय्या हे सीबीआयचे cbi प्रमुख आहेत का, की ईडीचे डायरेक्टर आहेत का? असा खोचक टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी लगावला.

सुप्रिया सुळे या औरंगाबादच्या दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली.

'केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत आहे. आणि हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. किरीट सोमय्या हे का. सीबीआय प्रमुख आहेत का किंवा ईडीचे डायरेक्टर आहेत का? केंद्रीय यंत्रणा चलन फाडणाऱ्या पोलिसांसारखे वाटत आहेत. यांच्यातून काही निघणार नाही, मात्र आम्ही लढत राहणार आहोत. सत्य कधी पराजित होत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

आहारात Vitamin D च्या समावेशामुळे कमी होत आहे कोरोनाचा धोका?

यावेळी पत्रकारांनी तुमची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का, असा सवाल विचारला असता, त्या म्हणाल्या की, 'जेंडर ट्रॅपमध्ये अडकायचे नाही. चांगलं काम करणारा व्यक्ती मुख्यमंत्री असावा' अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

तसंच, 'पत्रकारितेवर बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे दूरगामी परिणाम दिसत आहेत. बातम्यांची सत्यता पडताळली जात नाही किंवा इतरांचा विचार किंवा खरे खोटेपणा तपासला जात नाही.  समाज उपयोगी बातम्या निर्दयपणे कापल्या जातात. उथळ बातम्यांमुळे आमदार खासदार यांच्याबद्दल समाजात वाईट प्रतिमा निर्माण होते.  माझ्या आतापर्यंत वादग्रस्त मोठ्या बातम्या झाल्या नाहीत. पुढेही होऊ देणार नाही अशी देवाकडे प्रार्थना, असंही सुळे म्हणाल्यात.

भाजप नेत्यांच्या फायली ओपन करा - नाना पटोले

दरम्यान, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव गंमत करण्याचा आहे. त्यांच्या पद्धतीने ते बोलले. पण भाजप नेत्यांना दिवसा सत्तेची स्वप्न पडत आहेत. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल. यात कोणतीची शंका आमच्या मनात नाही. फडणवीस सरकारच्या काळातील काही फाईली काढण्याची वेळ झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही. किती खाल्ले तेही सांगून जावे' असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Shocking! अभिनेत्रीवर अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रयत्न; थोडक्यात बचावली, मात्र...

'रविवारी अनंत चतुर्दशी असताना स्टंटबाजी करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न भाजपने केला. माध्यमं असो, उद्योगपती असो किंवा राजकीय नेते यांवर आरोप करुन ब्लॅकमेल करण्याचं काम भाजप करतोय. कारण तसा अधिकारच केंद्रातील ब्लॅकमेलिंग सरकारने त्यांना दिला आहे' अशी टीकाही पटोले यांनी केली.

Published by: sachin Salve
First published: September 20, 2021, 7:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या