औरंगाबाद, 05 जून: औरंगाबादमधील शहागंज मंडीत शुक्रवारी एका कुख्यात गुंडाची धारदार शस्त्राने भोकसून हत्या (Infamous goon murder) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संबंधित मृत गुंडाचं नाव जमीर खान शब्बीर खान (Jamir Khan Shabbir Khan) असून त्याच्यावर अनेक चोरीच्या (Theft) आणि घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याची हत्या पैशाच्या देवाण घेवाणीतून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात (Accused arrest) घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय कुख्यात गुंड जमीर खान शब्बीर खान ऊर्फ जम्या याचा त्याच्या साडूसोबत पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला होता. त्यावरून त्यांच्यात अनेकदा खटकेही उडाले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मृत जमीर खान शहागंज मंडीतील चंद्रसागर जैन धर्मशाळेच्या समोरील इमारतीजवळ उभा होता. यावेळी जमीरचा साडू शोहेब खान आपल्या अन्य एका मित्रासोबत त्याठिकाणी आला. याठिकाणी शोहेबने पैशाच्या देवाण घेवाणीतून जमीरसोबत पुन्हा वाद घातला. हा वाद विकोपाला जाताच, आरोपी साडुने आणि त्याच्यासोबत आलेले एका मित्राने धारदार शस्त्राने जमीरवर ताबडतोब हल्ला केला.
आरोपींनी धारदार शस्त्राने जमीरच्या छाती, पोट आणि मांडीवर गंभीर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात जमीर जाग्यावरच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून धूम ठोकली. घटनास्थळी असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी जमीरला त्वरित घाटी रुग्णालयात नेण्यात आलं. जखमी जमीरला रुग्णालयात घेऊन जात असताना, पोलिसांना हा प्रकार लक्षात आला. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
हे ही वाचा-भरदिवसा शहरातील तडीपार गुंडाची दगडाने ठेचून हत्या; परिसरात खळबळ
घरफोडी आणि चोरीच्या गंभीर गुन्ह्यांत आरोपी
जमीर खान ऊर्फ जम्या हा घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपी आहे. त्याने परिसरात अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. पण मागील काही दिवसांपासून मृत जमीरने घरफोडी अथवा चोरी केली नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. याप्रकरणी सीटी चौक पोलिसांनी आरोपी साडू शोहेब खानला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Crime news, Murder