Home /News /aurangabad /

खासदारकीचा राजीनामा दिल्याने जर..., संभाजीराजेंनी स्पष्ट केली भूमिका

खासदारकीचा राजीनामा दिल्याने जर..., संभाजीराजेंनी स्पष्ट केली भूमिका

उद्या गुरुवारी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली

    औरंगाबाद, 26 मे: मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. उद्या गुरुवारी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली. तसंच, माझा राजीनामा दिल्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्या सुटत असेल, तर मी तयार आहे, असंही संभाजीराजेंनी  (Sambhaji Raje) स्पष्टपणे सांगितलं. खासदार संभाजीराजे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहे. मराठा संघटनाची चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आणि मराठा समाजाला आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. 'आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज अस्वस्थ आहे, समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी मी राज्यात फिरतोय, माझा दौरा कुठल्या पक्षाशी संबंधित नाही. समाजाचा घटक असल्याने त्यांना समजून घेणे माझं कर्तव्य आहे, मी मुख्यमंत्री, फडणवीस, शरद पवार या सगळ्यांची भेट घेणार आहे. उद्या शरद पवार यांची भेट घेणार आहे, त्यांच्यासोबत मराठा आरक्षणाबाबत चर्चा करणार आहे, असं संभाजीराजेंनी सांगितलं. मराठा समाज फॉरवर्ड क्लास आहे असं कोर्ट म्हणत मग आम्ही काय आता गप्प बसावे का? माझी भूमिका मी मांडेल, मात्र गरीब समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे, सगळ्या बहुजनांना न्याय मिळतोय मराठा समाजालाही मिळाला पाहिजे, असंही संभाजीराजे म्हणाले. 'सध्या रस्त्यावर उतरून आंदोलन करून लोकांना वेठीस धरणे योग्य नाही, सरकार ऐकत नसेल तर आंदोलन ठीक आहे मात्र हा सगळा विषय सध्या न्यायालयात आहे. त्यामुळे सरकारने काय देता येईल ते द्यावे आंदोलन करून सध्या तरी मार्ग निघणार नाही, असंही संभाजीराजेंनी मत व्यक्त केलं. मराठा समाजाला राजकीय रंग देऊ नका,  राज्यकर्त्यांनी आता भूमिका मांडण्याची वेळ आहे. सगळ्या नेत्यांनी समाजासाठी काय करता येईल, हे राजकारण सोडून करावे, असं आवाहनही संभाजीराजेंनी केलं. 'मराठा आरक्षणासाठी कुणी राजीनामे द्यावे हे मी सांगू शकत नाही. मात्र माझ्या राजीनामा दिल्याने प्रश्न सुटत असेल तर मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे, असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केले. विनायक मेटे यांचा मोर्चा हे त्यांचं मत आहे माझी बाजू स्पष्ट आहे रस्त्यावर उतरणे धोका आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची काळजी घेणे गरजेचं आहे, असंही संभाजीराजे म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत मी प्रकाश आंबेडकर, हरिभाऊ राठोड यांचीही भेट घेणार आहे. मात्र ही भेट 28 तारखेनंतर होईल आरक्षणापेक्षा सारथी जास्त महत्वाचं आहे, मराठा समाजाला दिशा देण्यासाठी सारथी जिवंत राहण्याची गरज आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या