मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

'जेवढ्या गाई तेवढंच तूप विकतो; आपलं बुवा रामदेव बाबांसारखं नाही', वडेट्टीवारांची तुफान फटकेबाजी

'जेवढ्या गाई तेवढंच तूप विकतो; आपलं बुवा रामदेव बाबांसारखं नाही', वडेट्टीवारांची तुफान फटकेबाजी

औरंगाबाद याठिकाणी विजय वड्डेटीवार यांनी बाबा रामदेव (Ramdev Baba) यांच्यावर तुफान फटकेबाजी केली आहे.

औरंगाबाद याठिकाणी विजय वड्डेटीवार यांनी बाबा रामदेव (Ramdev Baba) यांच्यावर तुफान फटकेबाजी केली आहे.

औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी मेळाव्यात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भारतीय जनता पक्षाला (BJP) आणि बाबा रामदेव (Ramdev Baba) यांच्यावर तुफान फटकेबाजी केली आहे.

  • Published by:  News18 Desk

औरंगाबाद, 07 ऑगस्ट: मागील काही दिवसांपासून राज्यात ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा चांगलाच तापत आहे. याच मुद्द्याच्या अनुषंगाने औरंगाबादमध्ये (Aurangabad) नुकतंच ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याच्या कार्यक्रमात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भारतीय जनता पक्षाला (BJP) चांगलंच धारेवर धरलं आहे. सोबतच वड्डेटीवार यांनी बाबा रामदेव (Ramdev Baba) यांच्यावर देखील तुफान फटकेबाजी केली आहे. 'जेवढ्या गाई आहेत, तेवढंच तूप विकतो,' अशा बोचऱ्या शब्दांत वड्डेटीवार यांनी टोलेबाजी केली आहे.

'रामदेव बाबा जेवढ्या गाई नाहीत, त्यापेक्षा अधिक तूप विकत आहेत. तर जेवढ्या मधमाशा नाहीत, त्याहून अधिक मध विकत आहे. पण आपलं तसं नाही, जेवढ्या गाई आहेत, तेवढंच तूप निघतं आणि तेवढंच तूप विकतो' अशा शब्दात वड्डेटीवार यांनी रामदेव बाबाला टोला लगावला आहे. ते औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या ओबीसी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी इंपेरिकल डेटावरून भाजप पक्षावरही निशाना साधला आहे.

हेही वाचा-तुम्ही तुमचं बघा, चंद्रकांत पाटलांच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

इंपेरिकल डाटासाठी भाजप सरकारच्या काळातही केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आलं होतं. आमचं सरकार आल्यानंतरही आम्ही केंद्र सरकारला पत्र पाठवलं होतं. पण केंद्राकडून इंपेरिकल डेटा देण्यात आला नाही. ओबीसींच्या हक्काच्या 40 हजार राजकीय जागा आहेत. त्या जागा आम्ही कुणालाही देऊ देणार नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी यावेळी दिला आहे. याशिवाय ओबीसी राजकीय आरक्षणासाठी सर्व समाजानं एकत्र यावं, असं आवाहन देखील वड्डेटीवार यांनी केलं आहे.

हेही वाचा-आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर मुंबईचा गड राखण्याची जबाबदारी?

सत्तेच्या खुर्चीचे चारही पाय हलवण्याची ताकद ओबीसी समाजात निर्माण झाली पाहिजे. तीन पक्षाच्या सरकारमध्ये एकमत व्हावं लागतं. आमचे मुख्यमंत्री समजदार आहेत. ओबीसी हॉस्टेलला निधी मिळत नव्हता, पण मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलवून ओबीसी हॉस्टेलला निधी उपलब्ध करून दिला आहे. ओबीसींना 2 हजार कोटी रुपये स्कॉलरशिप मिळते. पण फक्त 100 कोटी रुपये केंद्र सरकार देतं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

First published:

Tags: Aurangabad, Vijay wadettiwar