Home /News /aurangabad /

औरंगाबादमध्ये पावसाचं थैमान, पावसाची भीषणता दाखवणारा VIDEO आला समोर, पाहून व्हाल हैराण

औरंगाबादमध्ये पावसाचं थैमान, पावसाची भीषणता दाखवणारा VIDEO आला समोर, पाहून व्हाल हैराण

औरंगाबादेत पावसांचं अक्षरश: थैमान, VIDEO पाहून व्हाल हैराण

औरंगाबादेत पावसांचं अक्षरश: थैमान, VIDEO पाहून व्हाल हैराण

Horrible situation in Aurangabad after heavy rainfall, watch live video: औरंगाबादमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलं. पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा व्हिडीओ समोर आला आहे.

    सचिन जिरे, प्रतिनिधी औरंगाबाद, 2 ऑक्टोबर : पहाटे झालेल्या पावसाने औरंगाबाद जिल्ह्यात चांगलेच थैमान (Heavy rainfall in Aurangabad district) घातले आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयगाव तालुक्यातील तिडका नदीला तुफान पूर (flood to river) आला आहे. पावसाचे चांगलाच जोर पकडल्यामुळे सोयगावात अनेक ठिकाणी पूराचे पाणी घुसले. शनिवारी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने सोयगावात पूर आला आहे. या पुरामुळे सोयगाव मार्गे पाचोरा जोडणारा राज्यमार्ग बंद पडला आहे. (Shocking video shows situation of Aurangabad after heavy rain) सोयगाव तालुक्यातील तिडका नदीला तुफान पूर आला आहे. या पुरामुळे सोयगाव मार्गे पाचोरा जोडणारा राज्यमर्ग बंद पडला आहे. त्यामुळे औरंगाबाद जळगाव या दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. सध्या नदीच्या काठावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. औरंगाबाद शहरातील नारेगाव आणि पिसादेवी परिसरात पहाटेच्या पावसामुळे पाणी घुसले आहे. अनेक दुकाने आणि घरांमध्ये रात्रीतून पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. तसेच दुकानातील आणि घरातील वस्तू, मालाचे मोठे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी गावात आणि रस्त्यावर घुसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील हवामानाचा अंदाज 2 ऑक्टोबर कोकण - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 3 ऑक्टोबर कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 4 ऑक्टोबर कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. राज्यात पावसाचं थैमान: आतापर्यंत 436 जणांचा बळी तर 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान दोन दिवसांपूर्वी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात 71 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर राज्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत काही ठिकाणी 4 तर काही टिकाणी 8 वेळा अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. तर केवळ वीज कोसळून 196 जणांचा मृत्यू झाला आहे. 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान गुलाब चक्रीवादळामुळे 2 दिवसात पावसाने अनेक भागात नद्या ओसंडून वाहत आहेत. शेतीचं नुकसान झालं आहे. अनेकांना जीव गमवावा लागला, जनावर वाहून गेली आहेत. काही ठिकाणी 100 ते 150 मिली पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील 10 पैकी 7 जिल्ह्यात सरासरी 170 ते 190 मिली पाऊस झाला आहे. उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टर आणि बोटीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आतापर्यंत 81 % पंचनामे झाले असून 19% पंचनामे उर्वरित आहेत. 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे पंचनाम्यात अडथळे येत आहेत. पंचनामे झाल्यानंतर 22 लाख हेक्टर जमिनीच नुकसान होण्याची अंदाज आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Aurangabad, Maharashtra, Rain

    पुढील बातम्या