Home /News /aurangabad /

माणुसकीला काळिमा! बँकेच्या परीक्षेसाठी निघालेल्या गरीब दिव्यांग तरुणाची निर्घृण हत्या, कुटुंबाकडे पार्थिव घरी नेण्यासाठीही नव्हते पैसे

माणुसकीला काळिमा! बँकेच्या परीक्षेसाठी निघालेल्या गरीब दिव्यांग तरुणाची निर्घृण हत्या, कुटुंबाकडे पार्थिव घरी नेण्यासाठीही नव्हते पैसे

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

परीक्षेला पोहोचण्यासाठी या तरुणानं लिफ्ट मागितली. पण लिफ्ट देणाऱ्याने थेट त्याला कब्रस्तानात नेत चाकूने हल्ला केला. अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या छोट्या गावातल्या विकासच्या घरची परिस्थिती अगदी हालाखीची आहे.

    औरंगाबाद, 10 एप्रिल : औरंगाबादेत माणुसकीला काळीमा लावणारी अशी एक घटना घडली आहे. परीक्षेसाठी शहरात आलेल्या एका दिव्यांग तरुणाची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे परीक्षेला पोहोचण्यासाठी या तरुणानं आरोपीकडं लिफ्ट मागितली होती. पण मारेकऱ्यानं त्याला कब्रस्तानात नेत त्याची हत्या केली. पोलिसांनी तातडीनं तपास करत खुनाचा उलगडा केला असून आरोपीला अटक केली आहे. विकास चव्हाण नावाचा तरुण बँकेची परीक्षा देण्यासाठी पाथर्डीहून औरंगाबादला आला होता. हा तरुण एसटीनं गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास औरंगाबादमध्ये दाखल झाला. पण अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्यानं पैशाची कमतरता होती म्हणून रात्रभर बस स्टँडवरच झोपला. सकाळी आठ वाजता त्याची परीक्षा होती. त्यामुळं पहाटे लवकर उठून परीक्षा केंद्रावर त्याला जायचे होते. त्यानुसार विकास लवकर उठून निघाला. पण त्याला परीक्षा केंद्रावर घेऊन जायला कोणताही रिक्षावाला तयार होत नव्हता. त्यामुळं लिफ्ट मिळेल का या विचारात विकास होता. विकासच्या या सर्व हालचालींवर आरोपी फिरोज खान लक्ष ठेवून होता. त्याने संधीचा फायदा घेत विकासला परीक्षा केंद्रावर सोडतो असे सांगितले. विकासही लवकर केंद्रावर जाता यावे म्हणून त्याच्या गाडीवर निघाला. वाचा - बँड-बाजासह बलात्काराच्या आरोपीच्या घरी पोहचले पोलीस, Video Viral काही अंतरावर गेल्यानंतर आरोपी फिरोजने दुचाकी थेट एका कब्रस्तानाजवळ नेली. विकासला संशय आल्याने तो लगेच खाली उतरला. मात्र आरोपीने त्याला आत ओढत नेले. आत नेताच आरोपीने विकासच्या गळ्यावर आणि पोटात धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामुळं विकासचा जागीच मृत्यू झाला. या सर्व प्रकारात दिवस पहाटेचा अंधार कमी होऊन उजेड पडू लागला होता. त्यामुळं आरोपीनं विकासकडे असलेली रोख रक्कम आणि वस्तू घेतल्या आणि तिथून लंपास झाला. सकाळी साडे सातच्या सुमारास कब्रस्तानात खून झाल्याचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी लगेचच तपासाची चक्रे फिरवली. तपास करताना पोलिसांनी बस स्थानक परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी विकासला दुचाकीवरून नेत असल्याचे स्पष्टपणे दिसले. त्यावरून पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली. वाचा - रुग्णालयाचा सावळागोंधळ; जिवंत कोरोना रुग्णाला मृत ठरवलं, मृत्यूचा दाखलाही दिला अधिकारी व्हायचे होते मृत विकास चव्हाण हा अवघ्या 23 वर्षांचा होता. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये हरीचा तांडा इथं तो राहत होता.  लहानपणापासून एका पायाने अपंग असलेल्या विकाच्या घरची स्थितीही अत्यंत हलाखीची होती. घराज आजारी आई पलंगावर पडून आहे. त्याला सरकारी अधिकारी व्हायचं होतं. त्यासाठी तो प्रचंड मेहनत घेत होता. बँकेच्या परीक्षेसाठी तो दिवस रात्र तयारी करत होता. औरंगाबादमध्ये त्याची शुक्रवारी परीक्षा होती. पण त्याआधीच काळानं त्याच्यावर घाला घातला. मृतदेह नेण्यासाठीही पैसे नव्हते विकासचा भाऊ ऊस तोडणीचे काम करतो. त्याला हा प्रकार समजल्यानंतर धक्काच बसला. गावातील काही इतर व्यक्तींसह विकासचा भाऊ औरंगाबादला आला. पण पार्थिव गावी नेण्यासाठीही त्याच्याकडं पैसे नव्हते. पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी रुग्णवाहिकेचा खर्च करून मृतदेह पाठवण्याची व्यवस्था केली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Murder news

    पुढील बातम्या