Home /News /aurangabad /

'औरंगाबादचं नामांतर झालं नाही हा दोष फडणवीसांचा, कारण..', चंद्रकांत खैरेंनी साधला निशाणा

'औरंगाबादचं नामांतर झालं नाही हा दोष फडणवीसांचा, कारण..', चंद्रकांत खैरेंनी साधला निशाणा

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे स्वतः पाच वर्षे मुख्यमंत्री होते. संभाजीनगरचा (Sambhajinagar) मुद्दा घेऊन मी त्यांना वारंवार भेटलो, त्यांनी का नाही हे नामकरण केले. मुळात फडणवीस हे जनतेची दिशाभूल करतात, असा आरोप शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे (Former Shivsena MP Chandrakant Khaire) यांनी केला.

पुढे वाचा ...
औरंगाबाद, 16 मे : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे स्वतः पाच वर्षे मुख्यमंत्री होते. संभाजीनगरचा (Sambhajinagar) मुद्दा घेऊन मी त्यांना वारंवार भेटलो, त्यांनी का नाही हे नामकरण केले. मुळात फडणवीस हे जनतेची दिशाभूल करतात, असा आरोप शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे (Former Shivsena MP Chandrakant Khaire) यांनी केला. तसेच फडणवीसांनी संभाजीनगरसाठी काहीही केलेले नसल्याची टीकाही चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यावरून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली होती. त्यावरून शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सडेतोड उत्तर दिलंय. काय म्हणाले खैरे? फडणवीस हे स्वतः पाच वर्षे मुख्यमंत्री होते. संभाजीनगरचा मुद्दा घेऊन मी त्यांना वारंवार भेटलो, त्यांनी का नाही हे नामकरण केले? मुळात फडणवीस हे जनतेची दिशाभूल करतात. त्यांनी संभाजीनगरसाठी काहीही केलेले नाही, असा आरोप शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे. अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला. त्याचाही पाठपुरावा केला. पण केंद्राने तेही केले नाही. केवळ टाळ्या मिळवण्यासाठी अशी वक्तव्य करू नये, असंही खैरे म्हणाले. मला बहिरे म्हणतात. अहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत त्यांना पहा, असे म्हणत फडणवीस खोटे बोलत आहे, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले. हेही वाचा - सकाळी सकाळी संजय राऊतांनी केलेल्या Tweet ची सगळीकडे चर्चा, देवेंद्र फडणवीसांना दिलं उत्तर
नामांतर केले नाही हा दोष त्यांचा -
1988 पासून औरंगाबादला आम्ही संभाजीनगर म्हणत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. मी सगळीकडे संभाजीनगर बोलतो. २ वर्ष कायदेशीर तयारी केली आहे. आम्ही दोन अडीच वर्ष काम करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रिकामे बसले नाहीत. केंद्रांत आणि राज्यात भाजपाची सत्ता असून संभाजीनगर केले नाही, हा भाजपचा दोष आहे, असा आरोपही शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Aurangabad, Devendra Fadnavis, Maharashtra politics

पुढील बातम्या