यांना Coronaचं गांभीर्य नाही का? जिल्हा बँक संचालक मंडळ निवडीनंतर रुग्णालयाच्या शेजारी फटाके फोडून जल्लोष, सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा

यांना Coronaचं गांभीर्य नाही का? जिल्हा बँक संचालक मंडळ निवडीनंतर रुग्णालयाच्या शेजारी फटाके फोडून जल्लोष, सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कोविड नियमांचे पालन करण्याचं आवाहन वारंवार करत आहे. मात्र, राजकीय नेते सर्रासपणे याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे.

  • Share this:

नांदेड, 16 एप्रिल: राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढल्याने विषाणूची साखळी (Chain of coronavirus)  तोडण्यासाठी कठोर निर्बंध लागू (Strict restrictions) करण्यात आले आहेत. तसेच संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून नागरिकांना कोविड संदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. मात्र, असे असतानाच राजकीय नेतेच सर्रास नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. नांदेडमध्येही असाच प्रकार पहायला मिळाला.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीवेळी सोशल डिस्टंसिंगचा (Social distancing) फज्जा उडाला. शिवाय नांदेड़मध्ये दररोज 30 च्या जवळ मृत्यू होत असतांना नेते मंडळीचा असंवेदनशिलपणा दिसून आला. संचालक मंडळाच्या निवडीनंतर रस्त्यावर फटाके फोडण्यात आले. विशेष म्हणजे बँकेला लागूनच जिल्हा शासकीय रुग्णालय आहे ज्या रुग्णालयात दररोज 7 ते 8 मृत्यू होत आहेत. हा सर्व प्रकार पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत घडला.

वाचा: सहकार्य न केल्यास कडक Lockdown, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

आज नांदेड़ जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवड झाली. 21 पैकी 17 जागा जिंकत बँकेवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवले. अध्यक्षपदी काँग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहराराव भोसीकर यांची निवड करण्यात आली.

निवडीवेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थिती लावली. यावेळी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सोशल डिस्टंसिंग तर कुठेच नव्हते. जिल्हा रुग्णालय, कोविड सेंटर बाजुलाच असतांनाच फटाके फोडण्यात आले. त्यामुळे या सर्व राजकीय नेत्यांचा असंवेदनशिलपणा समोर आला आहे.

First published: April 16, 2021, 8:53 PM IST

ताज्या बातम्या