मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /शेतकरी कुटुंबाला बांधावर बेदम मारहाण, 2 दिवस उलटूनही गुन्हा दाखल नाही, VIDEO

शेतकरी कुटुंबाला बांधावर बेदम मारहाण, 2 दिवस उलटूनही गुन्हा दाखल नाही, VIDEO

दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा शेतातील बांधावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला.

दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा शेतातील बांधावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला.

दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा शेतातील बांधावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला.

सचिन जिरे,प्रतिनिधी

औरंगाबाद, 23 मे : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात बांधाच्या वादावरून शेतकरी (Farmer) कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, दोन दिवस उलटूनही मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील हातनूर गावात ही घटना घडली. कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.

नारायण काळे यांच्याकडे थोडीफार शेती आहे. शेतातील बांधावरून आरोपी कुटुंबासोबत नेहमी वाद होत होता. दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा शेतातील बांधावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला. काळे कुटुंबीयांना शिवीगाळ करत ठिबक सिंचनचे पाईप उपसून फेकून दिले. त्यानंतर वाद आणखी चिघळला आणि नारायण काळे यांना मारहाण करण्यात आली.

मोठी बातमी! श्रीलंकेच्या टीममधील 3 जणांना कोरोनाची लागण, मालिका संकटात

एवढंच नाहीतर पुरुषांसह महिलांनाही देखील बेदम मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. महिलांना लाथा बुक्याने मारहाण करण्यात आली आहे.  या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसात काळे कुटुंबाने धाव घेतली.

पण मारहाण होऊन दोन दिवस उलटले तरी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. राजकीय दबावातून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा पीडित काळे कुटुंबाने आरोप केला आहे.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, औरंगाबाद