मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

अपरात्री चिमुकलीचं अपहरण करून शेतात लपला नराधम; अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी शेतकऱ्यानं पेटवला ऊस

अपरात्री चिमुकलीचं अपहरण करून शेतात लपला नराधम; अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी शेतकऱ्यानं पेटवला ऊस

फोटो- दिव्य मराठी

फोटो- दिव्य मराठी

Crime in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक थरारक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 32 वर्षीय नराधमाने 6 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं होतं. चिमुकलीचं अपहरण केल्यानंतर तो उसाच्या शेतात लपला होता.

  • Published by:  News18 Desk
वाळूज, 22 फेब्रुवारी: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वाळूज (Waluj) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक थरारक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री एकच्या सुमारास याठिकाणी एका नराधमाने 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण (Minor girl kidnapping case) केलं होतं. पीडित मुलीचं अपहरण करून आरोपी उसाच्या शेतात शिरला होता. लख्ख काळोख असल्यानं आरोपीला पकडणं कठीण जात होतं. अशात प्रसंगावधान राखत शेतकऱ्याने थेट उसालाच आग ( farmer torch 1 acre sugarcane field) लावली आहे. त्यामुळे नराधम आरोपी उसातून बाहेर आला. तो बाहेर येताच उसतोड कामगारांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. विष्णू उत्तम गायकवाड असं अटक केलेल्या 32 वर्षीय नराधमाचं नाव आहे. तो जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 फेब्रुवारी रोजी पहाटे एकच्या सुमारास ऊस तोडणी कामगारांची तीन कुटुंबे बैलगाडीने मुक्तेश्वर साखर कारखाना (गंगापूर) येथून वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवपूर याठिकाणी आली होती. संबंधित ऊस तोडणी कामगार पहाटे तीनच्या सुमारास बाबासाहेब दुबिले यांच्या शेतात पोहोचले होते. हेही वाचा-एक-दोन नाही, तर एकाच वेळी तब्बल 85 मुलींशी केलं या पठ्ठ्याने Flirting! यावेळी पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या सहा आणि दहा वर्षांच्या दोन मुलींना बैलगाडीत झोपवून उसतोडणीच्या कामाला लागले होते. दरम्यान साडे तीनच्या सुमारास त्यांना आपल्या मुलींच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी बैलगाडीच्या दिशेनं धाव घेतली. एका अज्ञात व्यक्तीने लहान बहिणीला उचलून उसाच्या शेतात गेल्याची माहिती मोठ्या मुलीने दिली. त्यामुळे कामगारांनी एकत्र येत नराधमाला शोधण्याचा प्रयत्न केला. पण लख्ख काळोख असल्यानं आरोपीला पकडणं कठीण झालं. हेही वाचा-महिलेनं आखला प्लॅन; अल्पवयीन मुलीवर 8 जणांकडून रेप, महाराष्ट्राला हादरवणारी घटना यावेळी प्रसंगावधान दाखवत शेतकरी बाबासाहेब दुबिले यांनी एक एकर ऊस पेटवून दिला. उसाला आग लागल्यानंतर नराधम आरोपी उसातून बाहेर आला. यावेळी कामगारांनी आरोपीच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं. आरोपीनं चिमुकलीचं नेमकं कोणत्या कारणासाठी अपहरण केलं होतं. याची कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास वाळूज पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Aurangabad, Crime news

पुढील बातम्या