औरंगाबाद: कर्ज न मिळाल्याच्या नैराश्यातून शेतकऱ्याचे स्वतःवरच वार; पोलिसांकडून जनावराप्रमाणे वागणूक, पाहा VIDEO

औरंगाबाद: कर्ज न मिळाल्याच्या नैराश्यातून शेतकऱ्याचे स्वतःवरच वार; पोलिसांकडून जनावराप्रमाणे वागणूक, पाहा VIDEO

आपल्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रशासनाने लक्ष वेधून घेण्यासाठी औरंगाबादमधील (Aurangabad) एका शेतकऱ्याने (Farmer attacks himself for not getting farm loan) स्वतःच्याच डोक्यात वार करून घेतले आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, 20 सप्टेंबर : आपल्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रशासनाने लक्ष वेधून घेण्यासाठी औरंगाबादमधील (Aurangabad) एका शेतकऱ्याने (Farmer attacks himself for not getting farm loan) स्वतःच्याच डोक्यात वार करून घेतले आहेत. यामुळे हा शेतकरी जखमी झाला आणि त्याच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. मात्र त्याच्या भावना समजून न घेता गुराढोरांप्रमाणे पोलिसांनी त्याला पकडलं (Police caught him like animal) आणि जबरदस्तीनं गाडीत कोंबल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

अशी घडली घटना

औरंगाबाद जिल्ह्यातील वडोद बाजार भागात राष्ट्रीय बँकेतून पीककर्ज घेण्यासाठी हा शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून खेटे घालत होता. मात्र अद्याप त्याला बँकेतून कर्ज मिळालेले नाही. अगोदरच नैसर्गिक संकटाने कातावलेला हा शेतकरी बँकेच्या अधिकाऱ्यांनाही भेटला आणि त्यांना आपली गरज सांगितली. मात्र तांत्रिक कारणांमुळे या शेतकऱ्याला पीककर्ज मिळू शकले नाही. यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने व्यवस्थेचं लक्ष आपल्याकडं वेधण्यासाठी स्वतःच्याच डोक्यावर वार करून घेतले. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आणि पोलीस या तरुणाकडे धावले.

हे वाचा -काय सांगता! चेहरा रिंकल फ्री करणारं इंजेक्शन घेतल्यास कोरोना होत नाही?

एकीकडे पिकांच्या नुकसान भरपाईचे पैसे न मिळणे आणि दुसरीकडे नव्या पिकासाठी कर्जदेखील न मिळाल्याच्या वैफल्यातून या शेतकऱ्याने स्वतःवरच वार करण्याचा निर्णय घेतला. या घटनेचे गांभिर्य आणि शेतकऱ्याच्या भावना समजून न घेता पोलिसांनी त्याला एखाद्या जनावराप्रमाणे पकडून ठेवले आणि गाडीत कोंबले. ही घटना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. आपला प्रश्न मांडण्यासाठी आणि व्यवस्थेचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता स्वतःवरच हल्ला करण्याशिवाय काही पर्याय राहिला नसल्याची भावना हा शेतकरी व्यक्त करत होता. मात्र ती समजून न घेता पोलिसांनी तो एखादा गुन्हेगार असल्याप्रमाणे त्याला पकडल्याचा व्हिडिओ सध्या चर्चिला जात आहे. शेतकरी आपल्या प्रश्नावरून आक्रमक होत असून आता पुन्हा ते आत्महत्येकडे वळू नयेत, अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करत आहेत.

Published by: desk news
First published: September 20, 2021, 3:22 PM IST

ताज्या बातम्या