मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली अन् अडकला जाळ्यात; औरंगाबादेतील फायनान्स मॅनेजरला लाखोंचा गंडा

फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली अन् अडकला जाळ्यात; औरंगाबादेतील फायनान्स मॅनेजरला लाखोंचा गंडा

Crime in Aurangabad: ब्रिटनमधील महिलेच्या नावानं आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित महिलेनं औरंगाबाद येथील एका फायनान्स मॅनेजरला लाखोंचा गंडा घातला आहे.

    औरंगाबाद, 06 डिसेंबर: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील विटखेडा येथील रहिवासी असणाऱ्या 55 वर्षीय फायनान्स मॅनेजरला तब्बल तीन लाखांचा गंडा (3 lakh fraud) घातल्याची घटना समोर आली आहे. ब्रिटनमधील महिलेच्या नावानं आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. आरोपी महिलेनं विदेशातून भेटवस्तू (Gift sent from foreign ) पाठवल्याचं सांगत फिर्यादीची तब्बल तीन लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी फिर्यादीनं दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सतीश हिरालाल तिवारी असं फसवणूक झालेल्या 55 वर्षीय फिर्यादीचं नाव आहे. फिर्यादी तिवारी हे व्हेरॉक इंजिनीअरिंग कंपनीत फायनान्स मॅनेजर आहेत. तिवारी यांना मे महिन्यात लिझा मॉर्गन नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. संबंधित महिला ब्रिटनची असल्याचं तिने फिर्यादीला सांगितलं होती. त्यानंतर दोघांमध्ये सतत बातचित होऊ लागली. विश्वास संपादन केल्यानंतर संबंधित महिलेनं विदेशातून एक पार्सल पाठवलं असल्याची बतावणी तिवारी यांच्याकडे केली. हेही वाचा-हेअर ट्रान्सप्लांटच्या नावाखाली 300जणांना लावली लाखोंची शेंडी; बोगस डॉक्टचा कांड तसेच संबंधित पार्सल क्लिअर करण्यासाठी काही पैसे भरावे लागतील, असंही फेसबुकवरील महिलेनं सांगितलं. विश्वास बसावा म्हणून महिलेनं गिफ्टच्या पावतीचे  फोटोही फिर्यादीला पाठवले. यानंतर निशा कुमारी नावाच्या एका महिलेनं फिर्यादीला फोन केला आणि तुमच्या नावानं पार्सल आल्याची माहिती दिली. संबंधित पार्सल क्लिअरन्ससाठी 18 हजार 700 रुपये भरावे लागतील असं सांगितलं. यानंतर दुसऱ्या दिवशी निशा कुमारी या महिलेनं फिर्यादीला पुन्हा फोन केला आणि पार्सलमध्ये 30 हजार पाऊंड रोख रक्कम असल्याची माहिती दिली. तसेच ही रक्कम बेकायदेशीर असल्याचं सांगत दंड भरावा लागेल, अशी भीती दाखवली. हेही वाचा-मुंबई हादरली! फोन करून पत्नीला ऐकवला शेवटचा आवाज मग लेकीसोबत केलं राक्षसी कृत्य कायदेशीर कारवाई होईल या भीतीने तिवारी यांनी निशा कुमारीच्या दुसऱ्या खात्यात 57 हजार 800 रुपये पाठवले. यानंतर निशा कुमारी हिने संबंधित पाऊंडचे भारतीय रुपयांत रुपांतर करायचं असल्याचं सांगितलं त्यासाठी एक लाख दहा हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीनं ही रक्कमही आरोपी महिलेच्या अकाउंटवर पाठवली. तरीही फिर्यादीला विदेशातून पाठवलेलं गिफ्ट काही मिळालं नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं कळाल्यानंतर फिर्यादीनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपी महिलांनी वेळोवेळी विविध कारणं देत फिर्यादीकडून 3 लाखांची रक्कम लुटली आहे. तांत्रिक माहितीच्या अधारे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news, Financial fraud

    पुढील बातम्या