कन्नड, 03 ऑगस्ट: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील कन्नड (Kannad) तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. नातेवाईकांनी एका आजीला मृत समजून अंत्यसंस्काराची (Funeral) तयारी केली. रुढी परंपरेनुसार सर्व विधीही पार पाडले. तिरडीवर ठेवून स्मशानभूमीत (Graveyard) नेण्यात आलं. प्रेत सरणावर ठेवून शेवटचा विधी पार पडणार तोच आजीबाई जिवंत (Grandmother was alive) असल्याचं समोर आलं आहे. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रेत सरणावर ठेवून फक्त तोंड उघडं ठेवण्यात आलं होतं. दरम्यान आजीबाईंची पापणी हालल्यानं मुखाग्नी टळला आहे.
आजीबाई सरणावरच जिवंत झाल्यानं अनेकांना सुरुवातीला धक्का बसला होता. पण त्यानंतर नातेवाईकांनी त्वरित रुग्णलयात उपचारासाठी दाखल केलं आहे. काही तासांपूर्वी मृत समजून जिच्यावर आपण अंत्यसस्काराचे विधी पूर्ण केले, तीच आजी जीवंत असल्याचं पाहून अनेकांनी आनंदाचा पारावर उरला नाही. संबंधित घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील आहे.
हेही वाचा- डॉक्टरांनी कोरोना रुग्ण वृद्धाला मृत घोषित केलं, दीड तास मुलीने फोडला टाहो अन् त्यानंतर घडला चमत्कार
जिजाबाई वाल्मिकी गोरे असं संबंधित आजीबाईंचं नाव असून त्या 90 वर्षांच्या आहेत. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान त्या निपचित पडल्या होत्या. कितीही बोलण्याचा प्रयत्न केला तरी काहीही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे आजीबाईंचा मृत्यू झाल्याचा गैरसमज नातेवाईकांना झाला. त्यामुळे त्यांनी आजीबाईचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्या सर्व नातेवाईकांना दिली. तसेच अंत्यसंस्काराची सर्व तयारीही केली. काही वेळातच सर्व नातेवाईकही अंत्यसंस्कारासाठी दाखल झाले.
शेकडो नातेवाईकांच्या उपस्थितीत आजीबाईवर रुढी परंपरेनुसार सर्व विधी पार पडले. यानंतर त्यांनी तिरडीवर ठेवून स्मशानभूमीतही नेण्यात आलं. तसेच त्यांचा मृतदेह सरणावर ठेवून प्रेताला लाकडांनी झाकण्यातही आलं. शेवटचा विधी म्हणून पाणी पाजण्यासाठी केवळ चेहरा उघडा ठेवण्यात आला होता. पाणी पाजण्याच्या वेळी आजीबाईंची पापणी हालली आणि सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला. यानंतर आजीबाईंचा हात हलल्याचंही उपस्थितांच्या निदर्शनास आलं. यानंतर नातेवाईंकांनी त्वरित आजीबाईंना सरणावरून काढलं आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. हा घडलेला प्रकार पाहून नातेवाईकांना त्यांच्या डोळ्यावरच विश्वास नाही बसला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad