Home /News /aurangabad /

धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांची 83 कोटींची केली लूट, किरीट सोमय्यांच्या आरोपामुळे नवा वाद

धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांची 83 कोटींची केली लूट, किरीट सोमय्यांच्या आरोपामुळे नवा वाद

साखर कारखान्याच्या नावावर शेतकर्‍यांची 83 कोटी रूपयांची लुट केली, असा धक्कादायक आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या (Bharatiya Janata Party leader and former MP Dr. Kirit Somaiya) यांनी केला आहे.

    मुंबई, 16 डिसेंबर : राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Beed Guardian Minister Dhananjay Munde) यांनी जगमित्र साखर कारखान्याच्या नावे 10 वर्षांपूर्वी 83 कोटी भाग भांडवल जमा केले, पण अद्याप त्या जागेवर दगडही रोवला नाही. साखर कारखान्याच्या नावावर शेतकर्‍यांची 83 कोटी रूपयांची लुट केली, असा धक्कादायक आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या (Bharatiya Janata Party leader and former MP Dr. Kirit Somaiya) यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, या लुटीसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी घेतल्या. तर ज्यांनी जमिनी दिल्या नाहीत अशा मयत व्यक्तींच्या नावानेही खोटी स्वाक्षरी केली. या सर्व घोटाळ्याची चौकशी निःपक्षपाती करण्याची मागणी माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी केली बीड जिल्ह्यात अंबाजोगाई येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेत आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, भाजपा चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, उपस्थित होते. डॉ. किरीट सोमय्या यांनी आज अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील जगमित्र साखर कारखान्याच्या परिसराला भेट दिली. यानंतर त्यांनी बर्दापुर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकरणाचा तपास प्रामाणिकपणे झाला पाहिले अशी मागणी पोलिसांकडे केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले की, राज्यातील मंत्री धनंजय मुंडे यांनी पुस येथे जगमित्र साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी शेतकर्‍यांकडून 10 वर्षापूर्वी 83 कोटी रूपये भागभांडवल म्हणून जमा केले. हे ही वाचा-मोठी बातमी : 'या' निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आज दहा वर्षे लोटली तरीही साखर कारखान्याची उभारणी झाली नाही. हा सर्व पैसा, जमीन कुठे गेली? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. मुंडे यांनी या जमिनी घेताना मृत व्यक्तीच्या नावाने स्वाक्षरी केल्याची तक्रार दाखल आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने चार दिवसापुर्वीच दिले आहेत. तर आपण ही या घोटाळ्याबाबत ईडीकडे पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे. ठाकरे व पवार यांचे पोलिस खाते आता कशा पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करते? ही मी पाहणार आहे. मुंडे ज्या मतदार संघातील आहेत. त्याच हद्दीत पोलीस ठाणे असल्याने होणाऱ्या पोलीस तपासा बाबत आपण राज्याचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Dhananjay munde, Kirit Somaiya

    पुढील बातम्या