औरंगाबाद, 04 ऑगस्ट : राज्यात कोरोनाची (corona) लाट ओसरली असल्यामुळे मंदिरं सुरू करण्यासाठी भाजपने (bjp) मागणी लावून धरली आहे. 'राज्यात कोरोना परिस्थितीत आटोक्यात असल्यामुळे सर्व सुरू करायला हरकत नाही, पण कोविड फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्याशी बोलतो, की लाट कधी येणार आहे' असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी खिल्ली उडवली आहे.
औरंगाबादमध्ये (aurangabad) भाजपचा मेळावा पार पडला. यावेळी बोलत असता असताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
Zomato ला मोठं नुकसान; या दोन देशांमधील व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत कंपनी
'राज्यात तिसरी लाट येणार किंवा नाही हे फक्त उद्धव ठाकरे यांनाच माहीत असते कारण कोरोना फक्त उद्धव ठाकरे यांनाच बोलतो आणि मी काही उद्धव ठाकरे यांच्या सारखा डॉक्टर किंवा संजय राऊत सारखा कंपाउंडर नाही' अशी खिल्ली चंद्रकांत दादा पाटील यांनी उडवली.
Zomato ला मोठं नुकसान; या दोन देशांमधील व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत कंपनी
तसंच, महाविकास सरकारने आतापर्यंत फक्त केंद्राला दोष देत आले आहे. एकीकडे दोष देत आहे आणि दुसरीकडे राज्यात सर्वाधिक लसीकरण हे राज्यात झाल्याचा दावा करत आहे. त्यामुळे 65 कोटींचं लसीकरण झालं आहे, बहुतांश लोकांना लशीचे दोन डोस दिले आहे. त्यामुळे कोविडची तिसरी लाट येणारच नाही असं भाकित सांगायला मी काही उद्धव ठाकरे यांच्यासारखा डॉक्टर आणि संजय राऊत यांच्यासारखा कंपाऊंडर नाही. कारण, कोविड फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो. आता लाट कमी झाली, आता लाट वाढणार आहे, असं कोविड त्यांना सांगत आहे, माझ्याशी काही बोलत नाही' असा टोलाही पाटील यांनी लगावला.
IND vs ENG : खणखणीत सिक्स मारत 'हिटमॅन'चं शतक, भारताबाहेरची पहिलीच सेंच्युरी
तसंच, 'कोरोनाची लाट ओसरली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय सुरू करण्यासाठी हरकत नाही. कारण, मानसपोचार करणारे डॉक्टर सांगताय की, शाळा जर सुरू झाल्या नाहीतर मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होईल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
सेनेचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला
तर, होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे डॉक्टर आणि संजय राऊत कम्पाउंडर आहेत. कारण त्यांनी भाजपचे चांगलेच ऑपरेशन करून सरकार सत्तेत आणले. त्यामुळे भाजप सत्ता मिळाली नाही म्हणून वैफल्यग्रस्त अवस्थेत आहे, असा खणखणीत टोला सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.