तीन चाकांच्या रिक्षाचं भंगारही कुणी विकत घेणार नाही, सरकारचं आपत्ती व्यवस्थापन फोल ठरल्याची बावनकुळेंची टीका

तीन चाकांच्या रिक्षाचं भंगारही कुणी विकत घेणार नाही, सरकारचं आपत्ती व्यवस्थापन फोल ठरल्याची बावनकुळेंची टीका

महाराष्ट्रात आलेली नैसर्गिक आपत्ती (Natural Calamity) हाताळण्यात सरकार (MVA Government) सपशेल अपयशी ठरलं असून महाविकास आघाडीच्या रिक्षातील सर्व चाकं पंक्चर झाल्याची टीका माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 25  जुलै : महाराष्ट्रात आलेली नैसर्गिक आपत्ती (Natural Calamity) हाताळण्यात सरकार (MVA Government) सपशेल अपयशी ठरलं असून महाविकास आघाडीच्या रिक्षातील सर्व चाकं पंक्चर झाल्याची टीका माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. हे अस्मानी संकट असलं तरी त्याच्या सुलतानी हातळणीमुळे त्याचं गांभिर्य वाढल्याची टीका त्यांनी केली आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आज महाराष्ट्राच्या विविध भागातील नागरिक हाल सोसत असल्याची टीका त्यांनी केली आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

सरकार नियोजनशून्य

सरकारकडे नैसर्गिक आपत्तीला कसं तोंड द्यायचं याचं कुठलंही नियोजन नसून सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी ठरलं आहे, असं माजी मंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी म्हटलं आहे. मविआ सरकारच्या तिन्ही चाकांचे तुकडे उडायला सुरुवात झाली असून हा सांगाडा कुणी भंगारातही विकत घेणार नाही, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री मुंबईतून तर उपमुख्यमंत्री पुणे आणि बारामतीतून बाहेरच पडत नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

हे वाचा -Maharashtra Rain updates: येत्या आठवड्यात परत एकदा पावसाबाबत महत्त्वाची बातमी

मविआ सरकारमुळे ओबीसी आरक्षण गेलं

देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना वटहुकूम काढून ओबीसी आरक्षण टिकवून ठेवलं होतं. मात्र या सरकारनं तो वटहुकूम रद्द केला. शिवाय कोर्टातही नीट बाजू मांडली नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण जाण्यास सरकारचा नाकर्तेपणाच कारणीभूत असल्याची टीका त्यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना आधीच्या सरकारनं 3 महिन्यात एम्पिरिकल डेटा तयार केला होता. या सरकारनेदेखील तीन महिन्यात तो टेडा तयार केला नाही, तर सरकारला ओबीसी आरक्षण देण्याची इच्छा नाही, हे समजेल, असा दावा त्यांनी केला. डिसेंबर 2021 पर्यंत ओबीसींचं रद्द झालेलं आरक्षण पुन्हा मिळालं नाही, तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Published by: desk news
First published: July 25, 2021, 8:50 PM IST

ताज्या बातम्या