आदलाबदल झालेला फोन देण्याच्या बहाण्यानं आले अन् अपहरण केलं; 5 तासांत आवळल्या मुसक्या

आदलाबदल झालेला फोन देण्याच्या बहाण्यानं आले अन् अपहरण केलं; 5 तासांत आवळल्या मुसक्या

Crime in Aurangabad: अदलाबदल झालेला मोबाइल फोन परत देण्याच्या बहाण्याने आरोपींनी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या नातलगाचं अपहरण (Kidnap) केलं आहे. आरोपींनी 20 हजार रुपयांच्या खंडणीसाठी दिवसाढवळ्या एका व्यक्तीचं अपहरण केलं आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 11 जून: अदलाबदल झालेला मोबाइल फोन परत देण्याच्या बहाण्याने आरोपींनी औरंगाबाद (Aurangabad) येथील घाटी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या नातलगाचं अपहरण (Kidnap) केलं आहे. आरोपींनी 20 हजार रुपयांच्या खंडणीसाठी दिवसाढवळ्या एका व्यक्तीचं अपहरण केलं आहे. पण अवघ्या पाच तासांत पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या (5 Accused Arrest) आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

मुकीम फकीरचंद पठाण (वय-70), मुलगा सिकंदर मुकीम पठाण (वय- 35), नातू शाहरुख (वय-21), ईश्वर विठ्ठल दिशागच (वय-29) असं अटक केलेल्या आरोपींची नावं असून या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. संबंधित आरोपींनी गुरूवारी सकाळी आठ वाजता मोबाईल देण्याच्या बहाण्याने एका तरुणाचं अपहरण केलं आहे. याप्रकरणी आरोपींनी 20 हजार रुपयांची ऑनलाईन खंडणी मागितली होती. नातेवाईकांनी खंडणीची रक्कम म्हणून 10 हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा करताच आरोपींनी पीडित तरुणाला सोडून पोबारा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या पाच तासांत कारवाई करत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

जालना जिल्ह्यातील चापानेर येथील रमेश पवार नावाचे रुग्ण मागील दीड महिन्यापासून घाटी येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. पवार यांच्यासोबत रुग्णालयात त्यांचा मुलगा विष्णू आणि मेव्हुणा कृष्णा रघुनाथ वाघ हे रुग्णासोबत थांबले होते. दरम्यान 9 जून रोजी मेव्हुणे कृष्णा दूध आणण्यासाठी बाहेर गेले. यावेळी हॉटेलजवळ उभ्या असणाऱ्या 70 वर्षीय आरोपी मुकीमने कृष्णा यांना एक कॉल करण्यासाठी फोन मागितला. पण कृष्णा यांनी लवकर फोन दिला नाही.

हे ही वाचा-नागपूर ब्रेकिंग: खंडणी म्हणून मागितलं मुंडकं, अपहरण करुन मुलाची हत्या

त्यामुळे आरोपीने आपला मोबाइल फोन कृष्णा यांच्याकडे ठेवायला दिला अन् त्यांचा फोन स्वत:कडे घेतला. यानंतर आरोपीने बोलण्याचा बहाणा करत कृष्णा यांचा मोबाइल लंपास केला. आपला फोन लांबवल्याचं लक्षात येताच, कृष्णा यांनी आरोपीच्या मोबाईलमधील शेवटच्या नंबरवर कॉल केला. हा कॉल आरोपीचा मुलगा सिकंदरने उचलला. आरोपीने झालेला प्रकार ऐकून घेतल्यानंतर पीडितेला फोन देण्याचा बहाणा करत घाटी रुग्णालयाच्या परिसरात बोलावलं. याठिकाणाहून आरोपींनी कृष्णा यांचं अपहरण केलं.

हे ही वाचा-घरात घुसलेल्या तरुणाला 'दृश्यम' स्टाईलने संपवलं; असा गायब केला मृतदेह

यानंतर आरोपींनी कृष्णा यांचा भाचा विष्णूला कॉल करून 20 हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच खंडणीचे पैसे न दिल्यास कृष्णा यांना जीवे मारू अशी धमकीही आरोपींनी दिली. यानंतर घाबरलेल्या विष्णू यांनी अपहरणकर्त्याच्या अकाऊंटवर 10 हजार रुपये पाठवले. पैसे मिळल्यानंतर आरोपींनी कृष्णा यांना सोडून घटना स्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासांत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे. या घटनेचा पुढील तपास बेगमपुरा पोलीस करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: June 11, 2021, 10:19 AM IST

ताज्या बातम्या