Home /News /aurangabad /

जात ऐकताच वकिलाला नाकारलं घर, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

जात ऐकताच वकिलाला नाकारलं घर, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

Crime in Aurangabad: औरंगाबाद शहरातील चिखलठाणा परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका उच्चभ्रू सोसायटीत घर घेण्यासाठी गेलेल्या वकिलाला जातीचं कारण सांगून घर नाकारलं आहे.

    औरंगाबाद, 12 जानेवारी: औरंगाबाद शहरातील चिखलठाणा परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका उच्चभ्रू सोसायटीत घर घेण्यासाठी गेलेल्या वकिलाला जातीचं कारण सांगून घर नाकारलं आहे. संबंधित वकिलाने बांधकाम साईटवर जाऊन रो हाऊसची पाहाणी केल्यानंतर त्यांना घर आवडलं होतं. पण बांधकाम साईटवरील एका कर्मचाऱ्याने त्यांना जात विचारली. ते अनुसूचित जातीचे असल्याचं कळताच, संबंधित कर्मचाऱ्याने 'तुम्हाला इथे घर देता येणार नाही' असं म्हणत घराबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित वकिलाने रो हाऊस बांधणाऱ्या बिल्डरच्या कार्यालयात जाऊन घराबाबत चौकशी केली. पण त्याठिकाणी देखील जातीचं कारण सांगून बिल्डरने त्यांना घर देण्यास नकार दिला आहे. या संतापजनक प्रकारानंतर पीडित वकिलाने चिखलठाणा पोलीस ठाण्यात जाऊन बिल्डर आणि त्यांच्या कर्मचाऱ्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा-खाली पाडत नाक दाबून तोंडात ओतलं विष, निवृत्त पोलिसासोबत सुनेचं अमानुष कृत्य महेंद्र गंडले असं संबंधित वकिलाचं नाव आहे. ते औरंगाबाद खंडपीठात वकील म्हणून कार्यरत आहेत. 7 जानेवारी रोजी ते आपली पत्नी आणि मुलांसह भाईश्री ग्रुप निर्मित भूमी विश्वबन येथील रो हाऊसची साइट पाहण्यासाठी गेले होते. येथील रो हाऊस त्यांना आवडले. त्यामुळे त्यांनी साइटवरील कर्मचाऱ्यांकडे घराबाबत विचारणा केली. यावेळी येथील कर्मचाऱ्यांनी गंडले यांना त्यांची जात विचारली. हेही वाचा-औरंगाबाद: मोबाइलवर एक लिंक पाठवून सुरू झाला खेळ; 1400 जणांना लुबाडलं असा प्रश्न विचारल्याने गंडले यांना धक्का बसला. पण घर घेण्याची इच्छा असल्यानं त्यांनी आपण अनुसूचित जातीचे असल्याचं सांगितले. त्यावर 'तुमच्या जातीच्या लोकांना घर देता येणार नाही', असं कर्मचाऱ्यांकडून थेट सांगण्यात आलं. यानंतर गंडले हे रो हाऊस तयार करणाऱ्या बिल्डरच्या कार्यालयात गेले. येथे त्यांनी घराबाबत चौकशी केली. पण तिथेही त्यांना जात विचारून घर नाकारण्यात आलं. या धक्कादायक प्रकारानंतर गंडले यांनी चिखलठाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news

    पुढील बातम्या