Home /News /aurangabad /

दारू पाजून पोटभर जेवू घातलं मग केला घात; मेहुण्याने भाऊजीला दिला भयंकर मृत्यू, अखेर गूढ उलगडलं

दारू पाजून पोटभर जेवू घातलं मग केला घात; मेहुण्याने भाऊजीला दिला भयंकर मृत्यू, अखेर गूढ उलगडलं

Murder in Aurangabad: काही दिवसांपूर्वी कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील एका प्रकल्पाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या घटनेचं अखेर गूढ उलगडलं आहे. मेहुण्यानेच भाऊजींचा खून केल्याचं निष्पन्न झालं आहे.

    औरंगाबाद, 22 जानेवारी: काही दिवसांपूर्वी कन्नड (Kannad) तालुक्यातील नेवपूर येथील एका प्रकल्पाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला (Unknown dead body found) होता. संबंधित व्यक्तीचा गळा आवळून खून केल्यानंतर, धारदार शस्त्राने वार (Attack with sharp weapon) केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. पण संबंधित मृतदेह नेमका कोणाचा याबाबत गूढ बनलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केल्यानंतर, श्वानही घटनास्थळीच घुटमळल्याने मारेकऱ्याचा काहीही सुगावा लागला नव्हता. अखेर पिशोर पोलिसांनी या घटनेचं गूढ उलगडलं आहे. बहिणीचा छळ केल्याच्या कारणातून मेहुण्यानेच भाऊजींची निर्घृण हत्या (Brother in law killed sister's husband) केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मेहुण्याला ताब्यात घेतलं असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. कडुबा विठ्ठल साळुंखे असं हत्या झालेल्या भाऊजीचं नाव असून ते कन्नड तालुक्यातील चिमणापूर येथील रहिवासी आहे. तर सोमीनाथ राजधर खांदवे असं संशयित आरोपीचं नाव आहे. हेही वाचा-मित्र बायकोवर करत होता बलात्कार अन् पती देत राहिला पहारा, हिंगोलीतील घटना पोलिसांनी मृत तरुणाच्या कपड्यावरून मृताची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा अधिक तपास केला असता, घटनेच्या दिवशी मृत भाऊजी आणि मेहुणा एकत्र होते. त्यांनी एकत्र बसून मद्य प्राशन करत जेवण केलं होतं. जेवण झाल्यानंतर त्यांच्यात 'तू माझ्या बहिणीला त्रास देतो' या कारणातून वाद झाला होता. यानंतर आरोपी मेहुण्याने आपल्या भाऊजींना गोड बोलून नेवपूर येथील प्रकल्पाच्या खाली घेऊन गेला. हेही वाचा-जीवलग मित्रच झाले एकमेकांचे दुश्मन; एकावर वार, तर दुसऱ्याची गोळ्या झाडून हत्या यावेळी मेहुण्याने बेसावध असलेल्या भाऊजींचा गळा आवळून खून केला. त्यानंतर धारदार शस्त्राने शरीरावर वार केले. याप्रकरणी पाशेर पोलिसांनी अखेर घटनेचं गूढ उलगडलं आहे. पोलिसांनी आरोपी मेहुणा सोमीनाथ राजधर खांदवे याला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news, Murder

    पुढील बातम्या