भाजपच्या महिला नेत्यानं उचललं टोकाचं पाऊल; पती बाहेर झोपलेला असताना घरात घडला धक्कादायक प्रकार

भाजपच्या महिला नेत्यानं उचललं टोकाचं पाऊल; पती बाहेर झोपलेला असताना घरात घडला धक्कादायक प्रकार

Suicide in Aurangabad: औरंगबाद जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील नळणी बुद्रुक गणातील पंचयात समिती सदस्या पुष्पाबाई गजानन जाधव (Pushpabai Gajanan Jadhav) यांनी राहत्या घरात गळफास (Suicide) घेत आपल्या आयुष्याच्या शेवट केला आहे.

  • Share this:

भोकरदन, 11 सप्टेंबर: भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आत्माराम तोमर यांचा काल आपल्या घरात संशयास्पद मृतदेह आढळला होता. ही घटना ताजी असताना भाजपच्या महिला नेत्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. औरंगबाद (Aurangabad) जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील नळणी बुद्रुक गणातील  भाजपच्या (BJP) पंचायत समिती सदस्या पुष्पाबाई गजानन जाधव (Pushpabai Gajanan Jadhav) यांनी राहत्या घरात गळफास (Suicide) घेत आपल्या आयुष्याच्या शेवट केला आहे. रात्री घरात एकट्या असताना त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

नेमकं काय घडलं?

9 सप्टेंबर रोजी भाजप महिला नेत्या पुष्पाबाई जाधव या घरात एकट्याच झोपल्या होत्या. तर त्यांचे पती गजानन जाधव घराबाहेरील चबुतऱ्यावर झोपले होते. दरम्यान घरात एकटं असताना, रात्रीच्या सुमारास पुष्पाबाईनं यांनी राहत्या घरात गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पती गजानन जाधव सकाळी झोपेतून उठले असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा-अफेअरबाबत मुलानं केला प्रश्न; भडकलेल्या आईनं तापलेल्या पाईपनं केली मारहाण

ही घटना समोर येताच जाधव यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. मदतीसाठी लोकांना बोलावलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. या घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

हेही वाचा-लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईसोबत अमानुष कृत्य, उसात आढळला मृतदेह

मृत पुष्पाबाई जाधव यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची माहिती अद्याप समोर आली नाही. भोकरदन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू आहे. जाधव यांनी अचानक अशाप्रकारे जीवन संपवल्यानं कुटुंबाला मोठा धक्का बसला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by: News18 Desk
First published: September 11, 2021, 9:07 AM IST

ताज्या बातम्या