बीडमधील मराठा क्रांती मोर्चाला भाजपचं फडिंग; काँग्रेसचा धक्कादायक आरोप

बीडमधील मराठा क्रांती मोर्चाला भाजपचं फडिंग; काँग्रेसचा धक्कादायक आरोप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 ते 30 हजारांच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चा निघणार असल्याचं सांगितलं जात आहे,

  • Share this:

बीड, 4 जून : 'बीडमधील मराठा क्रांती संघर्ष मोर्चा लढा आरक्षणाचा हा भाजपचा अधिकृत मोर्चा आहे, हा मराठा समाजाचा मोर्चा नाही. या मोर्चाला भाजपची फडिंग आहे. विनायक मेटे हे भाजपचा मराठा आरक्षण प्रचार सेलचे अधिकृत सदस्य आहेत. त्यांनी मराठा समाजाची फसवणूक करू नये,' असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ संजय लाखे पाटील यांनी केला आहे. ते बीड मधील पत्रकार परिषद बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाचे जे प्रश्न असतील त्यासाठी आम्ही सोबत आहोत. मराठा समाज स्वतःहून रस्त्यावर उतरला तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरू आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू. आम्ही धास्ती घेतली आहे ती सहा तारखेच्या रायगडावरील कार्यक्रमाची. आमचे श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानाला काही गालबोट लागू नये, असेही ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा-उद्याचा मराठा क्रांती मोर्चा अटळ, 20 ते 30 हजार नागरिकांचा समावेश

संभाजीराजांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिकेसोबत आम्ही आहोत. संभाजीराजांनी उपस्थित केलेले मराठा समाजाच्या संदर्भातील सर्व प्रश्न सहा तारखेच्या अगोदर सोडविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्य सरकारचे प्रश्न राज्य सरकारने सोडवले पाहिजे आणि केंद्र सरकारचे प्रश्न केंद्र सरकारने सोडवला हवे. वाद घालू करू नये व मराठा समाजावर अन्याय करू नये अशी मागणी संभाजी राजांनी आहे. दुसरीकडे संभाजीराजे म्हणतात की, दिल्लीला जाऊन आपण हा प्रश्न सोडवू. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी मराठवाडयात फिरण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊन मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी केले

Published by: Meenal Gangurde
First published: June 4, 2021, 4:41 PM IST

ताज्या बातम्या