मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /भागवत कराडांची जन आशीर्वाद यात्रा गोपीनाथ गडावर, मुंडे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी

भागवत कराडांची जन आशीर्वाद यात्रा गोपीनाथ गडावर, मुंडे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी

Munde supporters slogans in support of Pankaja Munde: पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी गोपीनाथ गडावर जोरदार घोषणाबाजी केल्याचं पहायला मिळालं.

Munde supporters slogans in support of Pankaja Munde: पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी गोपीनाथ गडावर जोरदार घोषणाबाजी केल्याचं पहायला मिळालं.

Munde supporters slogans in support of Pankaja Munde: पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी गोपीनाथ गडावर जोरदार घोषणाबाजी केल्याचं पहायला मिळालं.

बीड, 16 ऑगस्ट : केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Paraty) नवनिर्वाचित मंत्र्यांची आजपासून जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad yatra) सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार हे विविध मतदारसंघात आपली जन आशीर्वाद यात्रा करत आहेत. मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात गोपीनाथ गडावरुन झाली आहे. यावेळी गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांची (Munde supporters) जोरदार घोषणाबाजी पहायला मिळाली.

केंद्रीय मंत्री भागवत कराड हे आपल्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करण्यासाठी गोपीनाथ गडावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे सुद्धा उपस्थित होत्या. याच दरम्यान पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळीपंकजा मुंढे यांनी समर्थकांची खरडपट्टी सुद्धा काढली मात्र, तरीही मुंडे समर्थकांनी आपल्या घोषणा सुरूच ठेवल्या. प्रचंड गदारोळात यात्रेला शेवटी सुरवात झाली. पंकजा मुंडे यांनी जन आशीर्वाद यात्रेला झेंडा दाखवला आणि त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली.

राज्यात भाजपच्या नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे, प्रितम मुंडे नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी आपले राजीनामा अस्त्र सुद्धा सुरू केले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी समर्थकांची समजूत काढत राजीनामे मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचंही जाहीपणे सांगितले. आता भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेतही पंकजा मुंडे सहभागी झाल्या.

खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने मुंडे भगिणी नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. इतकेच नाही तर मुंडे समर्थकांनी उघडपणे नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर भागवत कराड आणि पंकजा मुंडे यांच्यात आलबेल नसल्याचंही बोललं जात होतं. पण आपल्यात कोणताही वाद नसल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज पंकजा मुंडे यांनी स्वत: भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. मात्र, यावेळी मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पहायला मिळालं.

First published:
top videos