Shocking! वाढदिवसाला बोलावून पोत्यात गुंडाळून पेटवलं; 19 वर्षीय तरुणाची भयावह अवस्था, बीडमधील धक्कादायक घटना

Shocking! वाढदिवसाला बोलावून पोत्यात गुंडाळून पेटवलं; 19 वर्षीय तरुणाची भयावह अवस्था, बीडमधील धक्कादायक घटना

रात्रभर हा तरुण पोत्यात रस्त्याच्या कडेला पडून होता. जळीत कांडाच्या या घटनेने खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • Share this:

बीड, 23 सप्टेंबर : बीड जिल्ह्यातून (Shocking News From Beed) धारूर घाटातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाढदिवसाला बोलावून अमानुष मारहाण करत तरुणाला पोत्यात गुंडाळलं पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचा जीवघेणा प्रकार उघडकीस आला आहे. (youth was beaten inhumanely wrapped in a sack poured petrol and set on fire )

पेटवून दिलेला हा तरुण रात्रभर वेदनेने विव्हळत रस्त्याच्या कडेला पडून होता. आज सकाळी एका जीप चालकाना या तरुणाला रस्त्याच्या कडेला पडलेलं पाहिलं. त्यानंतर काही नागरिकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अर्धवट जळालेल्या तरुणावर आंबेजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा-मुंबई पुन्हा हादरली! डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार

कृष्णा अर्जुन गायकवाड असं या १९ वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात दिंद्रुड पोलिसात चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 365 सह जिवे मारण्याचा प्रयत्न 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळीत कांडाच्या या घटनेने खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तो 19 वर्षीय तरुण रात्रभर विव्हळत होता. दरम्यान पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. अशा प्रकारचे कृत्य का करण्यात आले, याबाबत शोध सुरू आहे. अद्याप तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचा चेहरा जळाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली होती. आपल्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रशासनाने लक्ष वेधून घेण्यासाठी औरंगाबादमधील (Aurangabad) एका शेतकऱ्याने (Farmer attacks himself for not getting farm loan) स्वतःच्याच डोक्यात वार करून घेतले आहेत. यामुळे हा शेतकरी जखमी झाला आणि त्याच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. मात्र त्याच्या भावना समजून न घेता गुराढोरांप्रमाणे पोलिसांनी त्याला पकडलं (Police caught him like animal) आणि जबरदस्तीनं गाडीत कोंबल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 23, 2021, 4:55 PM IST

ताज्या बातम्या