बीडमधील मृतदेह पळविण्याच्या प्रकरणाला वेगळं वळणं; मृत महिलेच्या भावाचा रुग्णालयावर धक्कादायक आरोप

बीडमधील मृतदेह पळविण्याच्या प्रकरणाला वेगळं वळणं; मृत महिलेच्या भावाचा रुग्णालयावर धक्कादायक आरोप

बीड जिल्हा रुग्णालयातून कोरोना बाधित महिलेचा मृतदेह नातेवाईकांनी घरी नेल्याच्या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतले आहे.

  • Share this:

बीड, 17 मे : बीड जिल्हा रुग्णालयातून कोरोना बाधित महिलेचा मृतदेह नातेवाईकांनी घरी नेल्याच्या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतले आहे. मृत महिलेच्या भावाने जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी अधिकारी यांनी मृतदेहांची अवहेलना केल्याचा आरोप करत पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. माझ्या बहिणीची चाचणी निगेटिव्ह असताना तिचा मृतदेह सुरुवातीला घेऊन जाण्यास सांगितले आणि नंतर अर्ध्या वरून बोलून घेत उलट आमच्या विरोधात मृतदेह पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

घरातील व्यक्तीच्या निधनामुळे आधीच दुःखाचा डोंगर कोसळला असताना त्यात मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप वकील सुभाष काबाडे यांनी केला आहे. तसेच जिल्हाशल्य चिकित्सक सूर्यकांत गीते, अतिरिक्त शल्य चिकित्सक सुखदेव राठोड, वॉर्डातील, वैद्यकीय अधिकारी गुट्टे, कर्मचारी, वार्ड बॉय यांनी आमची दिशाभूल करून मृतदेहाची अहवेलना केली या विरोधात रीतसर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा-ब्लॅक फंगसनंतर कोरोनाचे आता नवे परिणाम; शरीरावर सूज येण्यासह दिसतायेत नवी लक्षणं

बीड जिल्हा रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक पाच मधून सकाळी नातेवाईकांनी मृतदेह परस्पर वैद्यकीय तपासणी न करता घेऊन गेल्याची तक्रार वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बीड शहर पोलिसांना केली होती. यानंतर आता नातेवाईकांनी आरोग्य प्रशासनावर मृतदेहाचे अहवाल न केल्याचा आरोप लावला आहे. मयताच्या भावाने सांगितले की, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या संमतीने आम्ही मृतदेह घेऊन गेलो होतो आणि मृत देहाची दोन वेळा अँटिजेन टेस्ट निगेटीव्ह असल्यामुळे मृतदेह घेऊन जाण्यास परवानगी दिली होती.

पहाटे चार वाजता मृत्यू झाला आणि सकाळी टेस्ट निगेटिव्ह आली म्हणून आम्ही विनंती केली की आमच्या रुग्णाचा मृतदेह ताब्यात द्या. रुग्णालयाकडून मृतदेह नेण्यास परवानगी देण्यात आली, मात्र अर्ध्या रस्त्यापर्यंत मृतदेह पुन्हा आणण्यास सांगण्यात आले. तशीच गाडी आम्ही मागे घेऊन आलो. रुग्णालयात आल्यानंतर मृतदेह ताब्यात दिला. प्रशासनाला सहकार्य केले तरी पण रुग्णालय प्रशासनाने आमच्या विरोधात गुन्हा दाखल केला हे चुकीचं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 17, 2021, 11:29 PM IST

ताज्या बातम्या