Home /News /aurangabad /

बीड : ST महामंडळात महिला कर्मचाऱ्याची छेडछाड; तक्रार करायला जाताना प्रभारी लेखापालावर मारहाणीचा आरोप

बीड : ST महामंडळात महिला कर्मचाऱ्याची छेडछाड; तक्रार करायला जाताना प्रभारी लेखापालावर मारहाणीचा आरोप

यापूर्वीही साधारण दोन वर्षांपूर्वी एका अधिकाऱ्याने आपल्याच विभागातील महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत शरीर सुखाची मागणी केली होती.

बीड, 19 ऑगस्ट : बीड येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याने छेडछाड करीत कार्यालयातच मारहाण केल्याची घटना 14 ऑगस्ट रोजी घडल्याची माहिती समोर आली होती. घाबरलेल्या महिलेने याबाबत विभागीय नियंत्रकांकडे लेखी तक्रार केली आहे. या अगोदरही पीडित कर्मचाऱ्याला या अधिकाऱ्याकडून वारंवार छेडछाड होत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तसेच वाईट हेतूने पाहत असल्याचे देखील पीडित कर्मचाऱ्याने सांगितले. सांगताना महिला ढसढसा रडली. या घटनेनंतर एसटी महामंडळात खळबळ उडाली असून या बाबत अधिकाऱ्याला फोनवरून विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. विभागीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वीही साधारण दोन वर्षांपूर्वी एका अधिकाऱ्याने आपल्याच विभागातील महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत शरीर सुखाची मागणी केली होती. याची तक्रार केल्यानंतर दक्षता समितीने चौकशी केली. यात दोषी आढळल्याने संबंधित अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला होता. ही घटना विसरण्यापूर्वीच आता लेखा विभागात नवीन घटना घडली आहे. अविवाहित महिला कर्मचारी काम करत असताना तिला प्रभारी लेखापाल नारायण मुंडे यांनी वाईट हेतून स्पर्श केला. यावर ती रागावून वरिष्ठांकडे तक्रार देण्यास जाताना तिला पायऱ्यांवर अडवून मुंडे यांनी मारहाण केली. तसेच नोकरी घालविण्याची धमकी दिल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. हे ही वाचा-चुकलो, पण व्यक्ती म्हणून मी वाईट नाही;पत्र लिहून प्राध्यापकाच्या मुलानं सोडलं घर त्यानंतर 15 ऑगस्ट रोजीही धमकावल्याचा प्रकार घडला होता. पीडित महिला कर्मचारी विभागीय नियंत्रक अजय मोरे यांच्याकडे तक्रार घेऊन गेली. यावर तिला डेपोत बदली करतो, नाहीतर आणखी त्रास सहन कर, असे उत्तर दिल्याचे पीडिता सांगते. या प्रकारावरून मोरे यांच्याकडूनही अधिकाऱ्याला अभय असल्याचा आरोप पीडितेने केला आहे

तुमच्या शहरातून (औरंगाबाद)

Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Beed news, Crime news, Government

पुढील बातम्या