Music बंद केल्याने बारमध्ये धिंगाणा, टोळक्याची हॉटेल व्यवस्थापकाला बेदम मारहाण, घटनेचा VIDEO

Music बंद केल्याने बारमध्ये धिंगाणा, टोळक्याची हॉटेल व्यवस्थापकाला बेदम मारहाण, घटनेचा VIDEO

म्युझिक बंद केल्याच्या रागातून संतापलेल्या तरुणांनी हॉटेल व्यवस्थापकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

सचिन जिरे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 4 सप्टेंबर : गाणं आणि म्युझिक बंद केल्याने संतापलेल्या टोळक्याने हॉटेल व्यवस्थापकाला बेदम मारहाण (Hotel Manager beaten) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमधील (Aurangabad) ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Incident caught in CCTV) झाली आहे. या मारहाणीत हॉटेल व्यवस्थापकाच्या मनगटाचे हाड मोडले आहे. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमधील हडको परिसरातील लोटस बारमध्ये 2 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. हॉटेल व्यवस्थापकाने रात्री 10 वाजता म्युझिक बंद करण्याच्या सूचना दिल्या तसेच 10 वाजेपर्यंत सर्व ग्राहकांनी निघून जाण्यास सांगितले. यावेळी बारमध्ये आलेल्या काही ग्राहकांनी हॉटेल व्यवस्थापक दिलीप उचित यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

अनिल देशमुखांचा चौकशी अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला मिळाला होता iPhone 12 Pro

यानंतर आरोपींनी दिलीप यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. मग या टोळक्याने त्यांना बारच्या बाहेर खेचत आणले आणि खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यापैकी एका आरोपीने कमरेचा बेल्ट काढून मारहाण सुद्धा केल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे.

या घटनेनंतर दिलीप यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिलीप यांच्यावर घाटी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांच्या उजव्या हाताच्या कोपराजवळ, हाताच्या मनगटाला आणि डोळ्याच्या खालील बाजुला दुखापत झाली आहे.

Published by: Sunil Desale
First published: September 4, 2021, 10:23 AM IST

ताज्या बातम्या