Home /News /aurangabad /

औरंगाबाद हादरलं! सहा महिन्यांपूर्वी लग्न दाम्पत्यास चोरट्यांची बेदम मारहाण; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज

औरंगाबाद हादरलं! सहा महिन्यांपूर्वी लग्न दाम्पत्यास चोरट्यांची बेदम मारहाण; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज

Aurangabad Crime: नवदाम्पत्यास (Newlyweds Couple) चोरट्यांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेनं संपूर्ण औरंगाबादमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

    औरंगाबाद, 03 जुलै: औरंगाबादमध्ये (Aurangabad) नवदाम्पत्यास (Newlyweds Couple) चोरट्यांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेत 25 वर्षीय पतीचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. पत्नीची सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. धक्कादायक म्हणजे अवघ्या सहा महिन्यांपूर्वी या दाम्पत्याचं लग्न झालं होतं. गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास औरंगाबादमधल्या (Aurangabad Crime) वैजापूर (Vaijapur District) तालुक्यातल्या खांबाला फाटा वस्तीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण औरंगाबादमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 25 वर्षीय राजेंद्र जिजाराम गोरसे असं मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या 24 वर्षीय पत्नीचं नाव मोहिनी राजेंद्र गोरसे असं आहे. नेमकं प्रकरण काय? गुरुवारी रात्री जेवण झाल्यानंतर राजेंद्र आणि त्याची पत्नी मोहिनी दोघंही खोलीत गेले. तर राजेंद्रचे आई, वडील आणि बहिण हे तिघेही दुसऱ्या खोलीत झोपण्यासाठी गेले. त्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास 3 ते 4 अज्ञात चोरट्यांनी आधी राजेंद्रचे आई वडील झोपलेल्या खोलीची बाहेरुन कडी लावली. नंतर राजेंद्रच्या खोलीची कडी तोडली आणि आत प्रवेश केला. राजेंद्र आणि मोहिनी झोपेतून जागे झाले. नवदाम्पत्य समोर येताच आरोपींनी अज्ञात आरोपींनी त्यांना लाकडी दांड्यानं बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हेही वाचा- धक्कादायक पत्रानंतर सचिन वाझेची पुन्हा चौकशी, होणार मोठा खुलासा? या मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या राजेंद्रचा जागीच मृत्यू झाला. तर मोहिनी रक्ताच्या थारोळ्यात जखमी झाली. राजेंद्रच्या आई वडिलांनी आरडाओरड करताच गावकरी धावत येत होते. गावकरी येताना बघताच आरोपी पसार झाले. जखमी मोहिनीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर औरंगाबादच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Aurangabad, Crime

    पुढील बातम्या