Home /News /aurangabad /

BREAKING School Reopen: औरंगाबादमध्ये शाळा बंदच; आयुक्तांनी दिली धक्कादायक आकडेवारी

BREAKING School Reopen: औरंगाबादमध्ये शाळा बंदच; आयुक्तांनी दिली धक्कादायक आकडेवारी

कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही आणि तिसऱ्या लाटेत Coronavirus चा नवा variant Omicron लहान मुलांना लक्ष्य करत आहे. गेल्या 19 दिवसात 1 ते 10 वर्ष वयोगटातल्या 17, 533 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

औरंगाबाद, 20 जानेवारी:  राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा (Schools to reopen in Maharashtra) निर्णय जाहीर केलेला असला तरी औरंगाबादमध्ये (Aurangabad) कोरोनाचा वाढता संसर्ग बघता शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी घेतला आहे. औरंगाबादमध्ये शाळा बंदच औरंगाबाद मध्ये पोसिटीव्हीटी रेट 35%असल्याने लगेच शाळा सुरू करता येणार नाहीत. wait n watch ची भूमिका असल्याचं आयुक्तांचं म्हणणं आहे. पुढचे आठ दिवस परिस्थितीचं निरीक्षण करणार आणि संसर्गाचं प्रमाण कमी होत असल्याचं जाणवलं तरच औरंगाबादमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणार, असं आयुक्तांनी सांगितलं. हे वाचा: सावधान! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोरोनाची दिसतायत ही 5 लक्षणे मुंबईत पालकांचं संमतीपत्र आवश्यक राज्यातील शाळा आता पुन्हा सुरू (Maharashtra School Reopen) होणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमवारपासून (24 January 2022) शाळा सुरू होणार असल्याची माहिती दिली. पण मुंबईत मात्र पालकांच्या संमतीपत्राशिवाय विद्यार्थी शाळेत जाऊ शकणार नाहीत. मुंबईच्या महापौरांनी पालकांचं संमतीपत्र आवश्यक असल्याचं सांगितलं. 9 दिवसात 17, 533  मुलांना  कोरोना! गेली दोन वर्षं बंद असलेली शाळेची दारं (Maharashtra Schools to reopen) कोरोनाची दुसरी भयंकर लाट (Coronavirus Second wave) ओसरल्यावर उघडली होती. पण डिसेंबर अखेर तिसऱ्या लाटेच्या तडाख्यात पुन्हा शाळा बंद झाल्या. आता सोमवारपासून शाळा उघडण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education minister Maharashtra Varsha Gaikwad) यांनी जाहीर केला असला, तरी कोरोनाच्या दहशतीखालीच शाळा उघडणार हे निश्चित. हे वाचा: कोरोना लसीपासून तयार झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकते? संशोधनातून मोठा खुलासा कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही आणि तिसऱ्या लाटेत Coronavirus चा नवा variant Omicron लहान मुलांना लक्ष्य करत आहे. गेल्या 19 दिवसात 1 ते 10 वर्ष वयोगटातल्या 17, 533 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शाळा उघडायचा निर्णय़ झाला असला, तरी शाळेत मुलांना पाठवायचं का याबाबत पालकांच्या मनात चलबिचल आहे.
First published:

Tags: Aurangabad News, Coronavirus, Varsha gaikwad

पुढील बातम्या