खबरदार! विनाकारण बाहेर फिरल्यास थेट अँटिजेन टेस्ट; औरंगाबाद मनपाची शक्कल

खबरदार! विनाकारण बाहेर फिरल्यास थेट अँटिजेन टेस्ट; औरंगाबाद मनपाची शक्कल

शिफ्टनुसार दोन पथकं यासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती पांडेय यांनी दिली आहे. सकाळी 9 ते रात्री एक वाजेपर्यंत ही पथकं कारवाई करणार आहेत. अशा प्रकारची 12 मोबाईल पथकं यासाठी तैनात करण्यात आली आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, 16 एप्रिल : संचारबंदीच्या काळात विनाकारण कारणं सांगून बाहेर फिरणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी औरंगाबाद मनपानं (Aurangabad municiple corporation) एक शक्कल काढलीय. त्यानुसार आता विनाकारण फिरताना आढळणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट (Antigen tests of people roaming on roads) केली जाणार आहे. शहरातील विविध चौकात पोलिस आणि प्रशासनाकडून ही मोहीम राबवायला सुरुवातही करण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता औरंगाबादचा क्रमांकही वरच्या बाजुलाच आहे. शहरात रोज जवळपास दीड हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहे. कोरोनाची साखळी तोडून रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्याच्या हेतूनं राज्याच ब्रेक द चेन अंतर्गत कडक लॉकडाऊन आणि संचारबंदी लावण्यात आली आहे. काही सेवांना यातून सूट दिलेली असली तरी काही लोक विनाकारण रस्त्यांवर फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या अँटिजेन चाचणी केल्या जाणार आहेत. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.

(वाचा - ताईसाहेब! मोदींना एखादं पत्र लिहिलं तर बरं होईल, पंकजांना धनंजय मुंडेंचं उत्तर)

विशेष म्हणजे शिफ्टनुसार दोन पथकं यासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती पांडेय यांनी दिली आहे. सकाळी 9 ते रात्री एक वाजेपर्यंत ही पथकं कारवाई करणार आहेत. अशा प्रकारची 12 मोबाईल पथकं यासाठी तैनात करण्यात आली आहेत. यासाठी महानगर पालिकेने एका व्हॅनमध्ये चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हॅनसह हे पथक शहरात फिरेल. विनाकारण फिरताना दिसणाऱ्यांची हे पथक अँटिजेन चाचणी करणार आहे. शहरातल्या सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या ठिकाणांवर पोलिस आणि प्रशासनाची सर्वाधिक नजर असणार आहे.

(वाचा - संचारबंदीदरम्यान नातेवाईकाची गाडी अडवल्यानं आमदार प्रशांत बंब यांनी घातला वाद, पोलिसांना विचारला जाब)

शुक्रवारपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून एका जणांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं त्याला मनपाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे. त्यामुळं तुम्ही जर औरंगाबादेत असाल तर बाहेर पडण्यापूर्वी खरंच काम महत्त्वाचं आहे का याचा विचार करा. कारण बाहेर गेल्यावर तुम्हाला चाचणीला सामोरं जावं लागू शकतं.

Published by: News18 Desk
First published: April 16, 2021, 4:36 PM IST
Tags: aurangabad

ताज्या बातम्या