Home /News /aurangabad /

जलील ब्लॅकमेलर, MIM नं दुकानं उघडून दाखवावीच, चंद्रकांत खैरेंचं ओपन चॅलेंज

जलील ब्लॅकमेलर, MIM नं दुकानं उघडून दाखवावीच, चंद्रकांत खैरेंचं ओपन चॅलेंज

Aurangabad lockdown - शिवसेनादेखिल 1 तारखेला रस्त्यावर उतरले असा इशारा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जलील यांना दिला. तसंच खैरे यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर ब्लॅकमेलिंग करत असल्याचे गंभीर आरोपही केले आहेत.

औरंगाबाद, 25 मे : लॉकडाउनच्या (Lockdown) मुद्द्यावरून पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये (Aurangabad) एमआयएम विरुद्ध शिवसेना (MIM vs Shivsena) किंवा खैरे विरुद्ध जलील असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी कोणत्याही परिस्थितीत 1 जूनला औरंगाबादेत दुकानं उघडणारच, असा इशारा दिला आहे. तर इम्तियाज जलील यांनी 1 तारखेला दुकानं उघडून दाखवावी. शिवसेना देखिल 1 तारखेला रस्त्यावर उतरले, असा इशारा माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी जलील यांना दिला आहे. तसंच खैरे यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर ब्लॅकमेलिंग करत असल्याचे गंभीर आरोपही केले आहेत. (वाचा-1 जूननंतर औरंगाबादेत दुकानं उघडणार म्हणजे उघडणारच, खासदार जलील यांचा इशारा) औरंगाबादेत सध्या कोरोनाला आळा घालण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या मुद्द्यावरून संघर्ष पेटत असल्याचं दिसत आहे. 1 जूननंतर लॉकडाउनचं नेमकं काय होणार याचं अद्याप काही निश्चित ठरलेलं नाही. असं असतानाही आधीच यावरून वाद सुरू जाला आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी 1 तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादमधील दुकानं उघडणार असल्याचं म्हटलं आहे. सरकारचा काहीही निर्णय असला तरी आम्ही दुकानं उघडणारच प्रशासनानं हवं ते करावं, असा इशाराच जणू जलील यांनी दिला आहे. यावर लगेचच शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया आली आहे. (वाचा- कोरोनाबाधित बाळासाठी आईनं केलं जीवाचं रान; PPE किट घालून कोविड वॉर्डात ठोकला मुक) खासदार जलील यांच्यावर टीका करताना खैरे यांनी ते दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जलील यांनी एक तारखेला दुकान उघडून दाखवावीच.  जर जलील यांनी किंवा एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी दुकानं उघडण्याचा प्रयत्न केला तर शिवसैनिक त्याला उत्तर देतील, असं खैरे म्हणाले. 'राज्यावरील कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. कोरोनाचच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. अशा स्थितीत संबंधित वक्तव्य केल्या प्रकरणी जलील यांना अटक करण्याची मागणी खैरे यांनी केली आहे. त्यामुळे कोरोनामुळे शांत झालेलं औरंगाबादचं राजकीय वातावरण आता कोरोनामुळंच तापायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. जलील यांनी लॉकडाऊनला सुरुवातीपासून विरोध केला आहे. स्थानिक प्रशासनानं लॉकडाऊनला विरोध केला तेव्हाही त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आता पुन्हा त्यांनी हा मुद्दा उचलला आहे. तर शिवसेना नेते खैरे आणि जलील यांच्यात लोकसभा निवडणुकीपासूनच संघर्ष पाहायला मिळाला आहे. इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीनं कारवाई करण्याची मागणी खैरेंनी केली आहे. तसं केलं नाही तर जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Coronavirus, Lockdown

पुढील बातम्या