Home /News /aurangabad /

Aurangabad : वडील गमावल्याचं डोंगराएवढं दु:ख, तरी दुसऱ्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या सेवेत रुजू झाले डॉक्टर

Aurangabad : वडील गमावल्याचं डोंगराएवढं दु:ख, तरी दुसऱ्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या सेवेत रुजू झाले डॉक्टर

Aurangabad Doctor humanity 15 तारखेला डॉ. गायकवाड यांना पितृशोक झाला. वडील गेल्याचं मोठं दु:ख डॉ. गायकवाड यांच्या नशिबी आलं. मात्र त्यातही त्यांनी कर्तव्यात कसूर होऊ दिला नाही. दुसऱ्याच दिवशी डॉ. गायकवाड हे कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवेसाठी हजर झाले.

पुढे वाचा ...
    औरंगाबाद, 18 मे : कोरोनाच्या संकटानं (Coronavirus) माणसांचे अनेक चेहरे सर्वांसमोर आणले आहेत. अनेकांनी या संकटाचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करत स्वत:चं घर कसं भरता येईल याचा प्रयत्न केला. पण या संपूर्ण संकटात आरोग्य कर्मचारी (Health Worker) आणि विशेतः डॉक्टरांनी त्यांना देवाची उपमा का दिली जाते, हे पुन्हा दाखवून दिलं. असंत एक उदाहरण औरंगाबादेतून (Aurangabad Doctor) समोर आलं आहे. अगदी घरावर तुळशीपत्र ठेवून काम करणं कशाला म्हणतात, हे त्यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिलं. (वाचा-अमृता फडणवीसांच्या शायरीनं ट्विटरवर राजकीय वादळ; रुपाली चाकणकरांनी केला पलटवार) कोरोनाच्या संकटकाळामध्ये औषधी, ऑक्सिजन या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच. पण डॉक्टरच नसतील तर यांचा काय फायदा. त्यामुळं कोरोनाच्या या संकटात कोरोना योद्ध्यांचे सेनापती कुणी असेत तर ते हे डॉक्टर आहेत. आधीच डॉक्टरांची संख्या कमी. त्यात कोरोनाच्या उपचारांसाठी उपलब्ध डॉक्टर आणखी कमी. त्यामुळं कोविड सेंटरमध्ये असलेल्या डॉक्टरांवर मोठा ताण आहे. अनेक ठिकाणी त्यांना पर्यायी डॉक्टर उपलब्ध नसल्याने एकाच डॉक्टरवर भार आला आहे. पण अशाही परिस्थिती डॉक्टर कर्तव्याच्याही पुढं जाऊन काम करत आहेत. असेच एक डॉक्टर म्हणजे औरंगाबाद येथील. डॉ. रंजीत गायकवाड. डॉ. रंजीत गायकवाड हे आमदार प्रशांत बंब यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा देत आहेत. मात्र हे करत असतानाच त्यांनात दुःखाचा मोठा आघात सहन करावा लागला. 15 तारखेला डॉ. गायकवाड यांना पितृशोक झाला. वडिलच गेल्याचं मोठं दु:ख डॉ. गायकवाड यांच्या नशिबी आलं. मात्र त्यातही त्यांनी कर्तव्यात कसून होऊ दिला नाही. वडिलांचा अंत्यविधी आणि इतर गोष्टी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी डॉ. गायकवाड हे कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवेसाठी हजर झाले. (वाचा-...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू) डॉ. गायकवाड यांना वडील गेल्याचं दु:ख तर होतंच पण त्याचबरोबर त्यांच्या मनात रूग्णांची काळजीही होती. गेलेले वडील परत येऊ शकत नाहीत. पण जी लोकं हयात आहेत त्यांचा जीव आपण वाचवू शकतो ही भावना मनात ठेवत दुसऱ्या दिवशी  सकाळीच कोविड केअर सेंटरसध्ये ते हजर झाले. त्यांना पाहून रुग्णांच्या जीवातही जीव आला. विशेष म्हणजे स्वतःचं खासगी रुग्णालय आहे आणि कमाईसाठी त्यांनी असं केलं असं नाही. तर मोफत कोविड केअर सेंटरमध्ये ते सेवा देत आहेत. तरीही रुग्णसेवेलाच त्यांनी प्राधान्य दिलं. 'द शो मस्ट गो ऑन' असं म्हणत डॉ. रंजीत गायकवाड यांनी सर्व दु:ख बाजुला सारून रुग्णांप्रती माणुसकी दाकवली. ही माणुसकी डॉक्टरी पेशाचं भांडवल करून पैसा कमवणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे, यात शंका नाही​.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad News, Coronavirus

    पुढील बातम्या